८० टक्क्यांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण; ३१ हजार १७९ पशुधन ‘लम्पी’मुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 09:28 AM2022-10-08T09:28:59+5:302022-10-08T09:29:47+5:30
राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगाव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण १०० टक्के झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ व वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरणाच्या आकडेवारी नुसार सुमारे ८०.८६ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असून बाधित पशुधनापैकी ३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे झाले आहेत.
बाधित गावांतील एकूण ५९ हजार ८६५ बाधित पशुधनापैकी एकूण ३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अखेर एकूण ११५.११ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण ११३.१४ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ४२१ अहमदनगर जिल्ह्यातील २५२, धुळे जिल्ह्यात ३५ अकोला जिल्ह्यात ३९३, पुणे जिल्ह्यात १३६, लातूर मध्ये २५ यांसह इतर जिल्ह्यांतील पशुधनाच्या आकडेवारीसह एकूण २ हजार ५२८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"