राज्यात एक कोटी ६५ लाखांहून लाभार्थींना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:44 AM2021-05-06T02:44:29+5:302021-05-06T02:44:58+5:30
राज्यात मुंबईत आतापर्यंत २५,३२,२२४, पुण्यात २३,०१,८३३, ठाण्यात १३,१२,९४८, नागपूर १,०८,२३४, नाशिकमध्ये ७,६४,२३६ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे
मुंबई : राज्यात मंगळवारी ९८ हजार १५० लाभार्थींना लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण एक कोटी ६५ लाख ४९ हजार ८६४ लाभार्थींना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात मुंबईत आतापर्यंत २५,३२,२२४, पुण्यात २३,०१,८३३, ठाण्यात १३,१२,९४८, नागपूर १,०८,२३४, नाशिकमध्ये ७,६४,२३६ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १,११,२१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ६,३८,४९५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.१४४०००४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि ५,३८,१४२ फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत १,१२,६४,९११ सामान्य लाभार्थींना पहिला डोस, तर १५,५६,१६८ सामान्य लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे.
मागील आठवड्यापासून राज्य आणि मुंबईमधील कोरोना रुग्नाची संख्या आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबई, ठाणे, येथे लस उपलब्ध झाल्याने पुन्हा लसीकरण सुरु करण्यात आले आहे.