शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:05 AM2021-05-18T04:05:49+5:302021-05-18T04:05:49+5:30

लस तुटवडा, वाटप व्यवस्थापनातील गोंधळ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना विरोधातील लढ्यात लसीकरण हे प्रभावी शस्त्र असल्याचे तज्ज्ञ ...

Vaccination rates are lower in rural areas than in urban areas | शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी

शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी

Next

लस तुटवडा, वाटप व्यवस्थापनातील गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विरोधातील लढ्यात लसीकरण हे प्रभावी शस्त्र असल्याचे तज्ज्ञ सांगत असतानाच दुसरीकडे लसींचाच तुटवडा आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लस मिळत नसल्याचे तसेच लस वाटपातील व्यवस्थापन योग्य नसल्याचेही लसीकरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक लसीविना तिष्ठत आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये लसीकरण दोन अंकी लाखात झाले आहे. तुलनेने ग्रामीण भागातील कोट्यवधी नागरिक अद्याप पहिल्या डोसपासून वंचित आहेत. ग्रामीण भागात असमतोल वाटप झाले, अशी शंकाही काही जणांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यातून अनेक जिल्ह्यांत अपेक्षित लसीकरणही झाले नसल्याचे चित्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. डोसचे वितरणही योग्य प्रमाणात झाले नसल्याने राज्यातील फक्त काहीच जिल्ह्यांमध्ये चांगले लसीकरण झाले आहे. सर्वाधिक लसीकरण जालन्यात झाले; पण त्याच्याच शेजारी असलेल्या हिंगोलीत सर्वात कमी डोस मिळाल्यामुळे लसीकरण कमी नोंदवले गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लाखो ज्येष्ठ नागरिक अजूनही लसीविना आहेत.

१७ मेपर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी :

मुंबई २८ लाख ८९ हजार ४३७

सिंधुदुर्ग १ लाख ६९ हजार ६०६

रत्नागिरी २ लाख २७ हजार ८४८

रायगड ३ लाख ६१ हजार २२३

पालघर ३ लाख २१ हजार ५२४

ठाणे १५ लाख २६ हजार ६०६

पुणे २६ लाख १६ हजार ५२१

कोल्हापूर ११ लाख ३७ हजार ६७८

सातारा ७ लाख २०७

सांगली ६ लाख ७५ हजार ४६

अहमदनगर ५ लाख ९१ हजार ८५२

औरंगाबाद ५ लाख ४९ हजार ५२४

गडचिरोली १ लाख २९ हजार ७७२

हिंगोली १ लाख १५ हजार ४७१

नागपूर १२ लाख १० हजार ४२९

वाशिम २ लाख ३१५

....................................................

Web Title: Vaccination rates are lower in rural areas than in urban areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.