राज्यात दोन कोटी दहा लाख लाभार्थींना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:05 AM2021-05-26T04:05:37+5:302021-05-26T04:05:37+5:30
मुंबई : राज्यात सोमवारी दोन लाख ४९ हजार ३३९ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण दोन कोटी दहा ...
मुंबई : राज्यात सोमवारी दोन लाख ४९ हजार ३३९ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण दोन कोटी दहा लाख ४८ हजार १६९ लाभार्थींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात १८ लाख ८६ हजार ५३४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे, तर २४ लाख २१ हजार ६५६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. १८ ते ४४ वयोगटातील सात लाख २५ हजार ३०७ लाभार्थींना लस देण्यात आली आहे. ४५हून अधिक वय असणाऱ्या एक कोटी सहा लाख १४ हजार ६७२ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात मुंबई लसीकरणात आघाडीवर असून, आतापर्यंत ३० लाख ५८ हजार ७३८ लाभार्थींना लस देण्यात आली आहे. त्याखालोखाल २६ लाख ७० हजार ३११, नागपूरमध्ये १२ लाख ५८ हजार ९६६, ठाण्यात १५ लाख ८२ हजार ६९४ लाभार्थींना लस देण्यात आली आहे.
देशात महाराष्ट्र आघाडीवर
राष्ट्रीय पातळीवरचा विचार करता महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये एक कोटी ६५ लाख ४३ हजार २३४, राजस्थानमध्ये एक कोटी ६१ लाख ८३ हजार ७५०, गुजरातमध्ये एक कोटी ५७ लाख दोन हजार २७६ लाभार्थींना लस देण्यात आली आहे. देशात सर्वांत कमी लसीकरण लक्षद्वीप ३१,२७७, दादरा नगर हवेली ७४,८९८, दमण०दीव ८१,९१६ येथे झाले आहे.