बोरिवलीत दोन हजार महिलांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:43+5:302021-09-13T04:05:43+5:30
मुंबई : बोरिवलीतील सेंट रॉक्स शाळा, आरएससी १५, गोराई-२, बोरिवली पश्चिम येथे दि. १२ व १३ सप्टेंबरला महिलांसाठी विशेष ...
मुंबई : बोरिवलीतील सेंट रॉक्स शाळा, आरएससी १५, गोराई-२, बोरिवली पश्चिम येथे दि. १२ व १३ सप्टेंबरला महिलांसाठी विशेष कोविशिल्ड लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत २ हजार महिलांचे निःशुल्क लसीकरण करण्यात येणार आहे. आ. सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व फाऊंडेशन आणि जसलोक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण शिबिर राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन मिस दिवा युनिव्हर्स (२०१८) नेहल चुडासमा यांच्या हस्ते आणि आ. सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
अथर्व फाउंडेशनतर्फे यापूर्वी गोराई गाव आणि मनोरी येथील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन मनोरी येथे तीन वेळा विशेष लसीकरण मोहीम राबवून १ हजार ७०८ नागरिकांचे लसीकरण यशस्वीपणे करण्यात आले. तसेच बोरिवलीतही दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.