Join us

लस साठवणूक केंद्र आगामी ५० वर्षांची गरज करणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महानगरपालिकेतर्फे कांजूरमार्ग (पूर्व) येथील मामा मिराशी मार्गावरील परिवाराच्या इमारतीत नव्याने तयार केलेल्या लस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महानगरपालिकेतर्फे कांजूरमार्ग (पूर्व) येथील मामा मिराशी मार्गावरील परिवाराच्या इमारतीत नव्याने तयार केलेल्या लस साठवणूक केंद्राचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. कोविड-१९ लसीकरणाच्या साठ्यासाठी तयार केलेले हे लस साठवणूक केंद्र आगामी ५० वर्षांची गरज पूर्ण करणारे लस साठवणूक केंद्र झाले आहे.

काेविड लसीच्या साठवणुकीसाठी कांजूरमार्ग (पूर्व) येथील परिवार संकुलात अत्याधुनिक लस साठवणूक केंद्र निर्माण करण्यात आले आहे. संकुलातील पाचपैकी तीन माळे हे लस साठवणूक केंद्रासाठी पालिकेतर्फे निश्चित करण्यात आले. केंद्राची लस साठवणूक क्षमता १ कोटी २० लाख आहे. बाहेरील वातावरणाचा लसींवर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये, यासाठी या जागेवर २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमान राखणारी ४० क्युबिक मीटरची दोन उपकरणे बसविली आहेत. शीतगृहे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठ्यावर चालविण्यात येणार असल्याने विजेची बचत होऊन पर्यावरणाला हातभार लागेल. वीजपुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिटनिहाय स्वतंत्र डीजी सेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

........................