लस पुरवठा सध्या सुरळीत मात्र पुरवठा वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:06 AM2021-04-09T04:06:55+5:302021-04-09T04:06:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई शहरांत आणि राज्यात आता कोरोनावरील लसींचा तुटवडा भासत असताना कांदिवली, बोरिवली विभागात अद्याप लसीकरण व्यवस्था ...

Vaccine supply is now smooth but needs to be increased | लस पुरवठा सध्या सुरळीत मात्र पुरवठा वाढविण्याची गरज

लस पुरवठा सध्या सुरळीत मात्र पुरवठा वाढविण्याची गरज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

शहरांत आणि राज्यात आता कोरोनावरील लसींचा तुटवडा भासत असताना कांदिवली, बोरिवली विभागात अद्याप लसीकरण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. सरकारी आणि खासगी दोन्ही रुग्णालयांत लसीकरण सुरू असून या परिसरातील नागरिक लसीकरण करून घेत असल्याचे चित्र या भागात पहायला मिळत आहे. कांदिवली बोरीवलीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात काल आणि आजही लसीकरणासाठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. त्याचप्रमाणे तेथून चारकोप व इतर ठिकाणावरील लसीकरण केंद्रांवरही लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत असल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आर मध्य विभागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता येथील नगरसेवक आणि स्थानिक प्रशासन करत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जरी येथील खासगी व सरकारी रुग्णालयात लस पुरवठा आवश्यकतेप्रमाणे होता असला तरी लवकरच त्याचे प्रमाण वाढवावे लागणार असल्याचे मत येथील डॉक्टर्स व्यक्त करत आहेत. लस तुटवडा निर्माण होत असल्याच्या बातम्या या वाऱ्यासारख्या पसरत असल्याने लोकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे केंद्रावर त्याचे नियोजन करणे अवघड होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्याचा आवश्यक पुरवठा आत्ताच असणे गरजेचे असल्याचे मत ते व्यक्त करत आहेत.

Web Title: Vaccine supply is now smooth but needs to be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.