गिरगांव चौपाटीवर फिरत्या वाहनावरील निर्वात प्रसाधनगृह 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:44 PM2021-08-24T19:44:26+5:302021-08-24T19:45:17+5:30

९० टक्के पाण्याची बचत; सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा

vacuum toilet on a moving vehicle at Girgaon Chowpatty | गिरगांव चौपाटीवर फिरत्या वाहनावरील निर्वात प्रसाधनगृह 

गिरगांव चौपाटीवर फिरत्या वाहनावरील निर्वात प्रसाधनगृह 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - गिरगांव चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी फिरत्या वाहनावरील निर्वात प्रसाधनगृह (व्याक्युम मोबाईल टॉयलेट) तयार करण्यात आले आहे. हे पर्यावरणस्नेही  प्रसाधनगृह प्रायोगिक तत्त्वावर पुढील सहा महिने कार्यरत राहणार आहे. येथे तब्बल ९० टक्के पाण्याची बचत करण्याची क्षमता असलेल्या या प्रसाधनगृहातील निर्वात यंत्रणा सौर उर्जेवर चालते. 

अशी होणार ९० टक्के पाण्याची बचत

प्रत्येक फ्लशमध्ये सुमारे सव्वा लीटर पाण्याचा उपयोग या शौचालयात होतो. त्यामुळे दोनशे लीटर पाण्याचा उपयोग करुन जवळपास शंभर फ्लश करता येते. सर्वसाधारण प्रसाधनगृहांमध्ये दोनशे लीटर पाण्यात २० फ्लश होतात. म्हणजेच प्रत्येक फ्लशमध्ये किमान १० लीटर पाणी वापरात येते. या निर्वात प्रसाधनगृहामध्ये ९० टक्के पाण्याची बचत होते. 

असे आहे प्रसाधनगृह...

* महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी एक असे एकूण दोन शौचकुपे असलेले हे प्रसाधनगृह एका वाहनावर स्थित आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार हव्या त्या ठिकाणी नेऊन प्रसाधनगृह सुविधा पुरविता येते. 

* या प्रसाधनगृहातील निर्वात यंत्रणा सौर उर्जेवर कार्यरत राहते. त्यामुळे ते पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे. हे प्रसाधनगृह २४ x ७ उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी  दोन वाहन चालक नेमले आहेत. 

* सद्यस्थितीत हे प्रसाधनगृह प्रायोगिक तत्त्वावर पर्यटकांना वापरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. चौपाटीवर देशभरातूनच नव्हे तर विदेशातून देखील पर्यटक येत असतात. त्यांच्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.   

Web Title: vacuum toilet on a moving vehicle at Girgaon Chowpatty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई