अलर्ट करूनही काही लोक ऐकत नाहीत, म्हणूनच अशा घटना घडतात; चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 05:44 PM2021-07-18T17:44:03+5:302021-07-18T17:48:49+5:30

मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे. तातडीची मदत म्हणून १० हजारांची मदत आणि पंचनामे केल्यानंतर घराच्या डागडुजीसाठीही मदत करण्यात येणार आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हणटले आहे.

Vadettivar's reaction to the Chembur, Vikhroli tragedy says Some people do not listen even alerts, that is why such incidents happens | अलर्ट करूनही काही लोक ऐकत नाहीत, म्हणूनच अशा घटना घडतात; चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया  

अलर्ट करूनही काही लोक ऐकत नाहीत, म्हणूनच अशा घटना घडतात; चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया  

Next

नागपूर - काल पहाटेपासून मुंबईत अतिवृष्टीमुळे 345 मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात सांताक्रूझ, चेंबूरमध्ये अधिक पाऊस झाला. चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून २१ जणांचा मृत्यू. एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. ६-७ मृतदेह सापडले. डोंगरावर घरे असल्याने त्यांना अलर्ट करत असतो. पण काही लोक ऐकत नाहीत, त्यामुळे अशा घटना घडतात. मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे. तातडीची मदत म्हणून १० हजारांची मदत आणि पंचनामे केल्यानंतर घराच्या डागडुजीसाठीही मदत करण्यात येणार आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हणटले आहे. (Vadettivar's reaction to the Chembur, Vikhroli tragedy says Some people do not listen even alerts, that is why such incidents happens)

वडेट्टीवार म्हणाले, यंदा मुंबईत पाऊस जास्त. भंडाऱ्यात धानाची रोपे सुकायला लागली आहेत. पावसाचा अचूक अंदाज वर्तवणे शक्य नाही. हवामानाचा अंदाज न लावता आल्याने वारंवार समस्या निर्माण होतात. हवामान खात्याचे अंदाज चुकतात. हीच बाब लक्षात घेता राज्य आपत्ती विभागाचे केंद्र नागपुरातील मिहानमध्ये उभारणार आहोत. यासाठी १६०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. कुठल्याही आपत्तीसाठी येथील यंत्रणा तयार असेल. महत्याचे म्हणजे कुठल्याही आपत्तीची माहिती अगोदरच कळेल. 

या केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञान राहणार असून तेथे सल्लागारदेखील नेमले आहेत. येथे इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर होईल. यामुळे नुकसानाचे पंचनामेदेखील शक्य होतील. हे केंद्र वर्षभरात कार्यान्वित होणार आहे. हे केंद्र १० एकर एवढ्या जागेवर असेल. केंद्रातील निधीचाही यासाठी वापर करण्यात येणार आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Vadettivar's reaction to the Chembur, Vikhroli tragedy says Some people do not listen even alerts, that is why such incidents happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.