वाशीत रिक्षा चालकांमध्ये वाद
By admin | Published: July 19, 2014 01:13 AM2014-07-19T01:13:05+5:302014-07-19T01:13:05+5:30
वाशी रेल्वे स्टेशनसमोर रिक्षा चालकांना होणारी मारहाण थांबविण्यात यावी, गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी आंदोलन केले.
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनसमोर रिक्षा चालकांना होणारी मारहाण थांबविण्यात यावी, गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी आंदोलन केले. पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून मदतीची मागणी केली आहे. या ठिकाणी मराठी व अमराठी वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याठिकाणी मागील १५ दिवसांमध्ये ४ रिक्षा चालकांना मारहाण करण्यात आली आहे. परप्रांतीय रिक्षा चालकांना शेअरिंगमध्ये व्यवसाय करून दिला जात नाही. काहीजण दादागिरी करत असल्याचा आरोप करत १०० पेक्षा जास्त चालकांनी आज सेंटर वनसमोरील पोलीस चौकीत धाव घेतली. स्टेशनसमोर लायसन्स व बॅच असणाऱ्या सर्वांना नियमाप्रमाणे व्यवसाय करता यावा. कोणी चुकत असेल तर पोलिसांनी नियमाप्रमाणे कारवाई करावी, मागणी केली. (प्रतिनिधी)