Join us

व्हॅलेंटाइन्स फिव्हर!

By admin | Published: February 10, 2016 4:10 AM

व्हॅलेंटाइनच्या तयारीत यंगस्टर्स बिझी असून, ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या प्रत्येक दिवसाला स्पेशल बनविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. प्रत्येक दिवसाचे वेगळे गिफ्ट्स घेण्यासाठी

मयुर तावरे, मुंबईव्हॅलेंटाइनच्या तयारीत यंगस्टर्स बिझी असून, ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या प्रत्येक दिवसाला स्पेशल बनविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. प्रत्येक दिवसाचे वेगळे गिफ्ट्स घेण्यासाठी घाईत असलेल्या कॉलेजिअन्ससाठी मार्केटमध्येही ट्रेंडी गिफ्ट्स उपलब्ध आहेत. शिवाय, अगदी कमी रुपयांपासून ते थेट ‘ब्रँडेड’ गिफ्ट्सची रेलचेल बाजारात दिसून येतेय.आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत खास भावना पोहोचविण्यासाठी मार्केट्समध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय, ‘व्हॅलेंटाइन डे’ला तुमचे पाकीट रिकामे होणार नाही, याची दक्षताही मार्केटने घेतलेली दिसून येतेय. कारण ही गिफ्ट्स अगदी ५० रुपयांपासून ते थेट ५० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.कीचेन्स, कॉफी मग, कपल्स स्टॅच्यू, हार्ट कँडीज्, टेडी, रोझेस्, अत्तर, चॉकलेट्स, घड्याळ, हाफ-हार्ट नेकलेस, ब्रेसलेट, फोटो फ्रेम्स, नेम एम्बॉसिंग गिफ्ट्स, मोबाइल कव्हर्स, टीशर्ट्स, फंकी जॅकेट्स, हार्टशेप पिलो, म्युझिकल ग्रीटिंग कार्ड्स असे एकापेक्षा एक गिफ्ट्स मार्केटमध्ये आली आहेत. गिफ्ट्समध्ये चॉकलेट्स बुके, टेडीज्, सेंट्ेड रोझेस् या गिफ्ट्सना अधिक मागणी असते. एरव्ही तीन आणि चार हजाराला मिळणारे सात ते आठ फुटांचे ‘टेडी’ हे टेडी डे च्या निमित्ताने सहा ते आठ हजाराला विकले जात आहेत, तर एक-दोन हजारांचे छोटे टेडी हे तीन ते चार हजाराला दुप्पट-तिप्पट दराने विकले जात आहेत.गेल्या आठवड्यापासून दादर, वांद्रे लिंक रोड, पाली हिल, फॅशन स्ट्रीट, माटुंगा, कुलाबा कॉझवे, क्रॉफर्ड मार्केट, नटराज मार्केट, बोरीवली, मुलुंड अशा ठिकाणी कॉलेजिअन्सची गर्दी वाढतच चाललीय. शिवाय, काही स्मार्ट यंगस्टर्सने ‘आॅनलाइन’ शॉपिंगचा फंडा आजमावून आपल्या पार्टनरला सरप्राइस द्यायचे ठरवलेय.काही कॉलेजिअन्सने थीम बेस गिफ्ट्स खरेदीकडे मोर्चा वळवलाय. प्रेमाचे रंग मानले जाणाऱ्या ‘डिसेंट पिंक’ आणि ‘अ‍ॅट्रॅक्टिव्ह रेड’ अशा रंगांवर आधारित गिफ्ट्सही मार्केटमध्ये असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.