Join us

नमुना कराराचे ‘वैधमापन’ होणार!

By admin | Published: August 06, 2015 1:41 AM

मुंबई, पुणे व कोकणातील बड्या बिल्डरांवर १८ गुन्हे दाखल झाल्यामुळे अगोदरच सरकारच्या डोळ््यात सलत असलेल्या वैधमापन विभागाने आता बिल्डरांनी

संदीप प्रधान , मुंबईमुंबई, पुणे व कोकणातील बड्या बिल्डरांवर १८ गुन्हे दाखल झाल्यामुळे अगोदरच सरकारच्या डोळ््यात सलत असलेल्या वैधमापन विभागाने आता बिल्डरांनी त्यांच्या गृहनिर्माण योजनेतील सदनिका विक्रीचा नमुना करार या विभागाकडे तपासणीकरिता पाठवावा लागणार आहे. बिल्डर त्यांच्या गृहनिर्माण योजनेतील सदनिकांची विक्री करताना लिफ्ट, गार्डन, बाल्कनी वगैरे सोयीसुविधांचे क्षेत्रफळ सदनिकाधारकांच्या कार्पेट क्षेत्रफळात समाविष्ट करीत असल्याने सदनिका खरेदी करणाऱ्यांना बरेच कमी क्षेत्र प्रत्यक्ष वापरण्यास मिळते. याच हेतूने वैधमापन विभागाचे नियंत्रक संजय पांड्ये यांनी मुंबईतील काही बड्या बिल्डरांवर गुन्हे दाखल केले. काही सदनिका सील केल्या. पुण्यातील एका बिल्डरवर या विभागाने मंगळवारी कारवाई केली. एका सदनिका खरेदी करणाऱ्या व्यक्तीस बिल्डर करारापेक्षा ४०० चौ.फू. कमी क्षेत्रफळाची सदनिका विकत असल्याची तक्रार आल्याने ही कारवाई केली. येथेही सदनिका सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकेका प्रकरणात कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी बिल्डरांनी त्यांच्या गृहनिर्माण योजनांमध्ये बांधलेल्या सदनिकांची विक्री करण्यापूर्वी नमूना करार वैधमापन विभागाकडून मंजूर करून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ हाऊसिंग इंडस्ट्रीला पत्र लिहिणार असल्याचे नियंत्रक संजय पांड्ये यांनी सांगितले.