वामन केंद्रे यांना एनएसडीचा ‘ब. व. कारंथ राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:59 AM2019-03-06T01:59:14+5:302019-03-06T01:59:20+5:30

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संमतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने दिला जाणारा ‘ब. व. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार’ यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे.

 Vaman Kendra has been named as NSD's 'B' And Announced 'Karanth National Award' | वामन केंद्रे यांना एनएसडीचा ‘ब. व. कारंथ राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

वामन केंद्रे यांना एनएसडीचा ‘ब. व. कारंथ राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

Next

मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संमतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने दिला जाणारा ‘ब. व. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार’ यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. रोख रुपये एक लाख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्लीच्या वतीने सदर पुरस्कार हा आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान व्हावा, या हेतूने एनएसडीचे पूर्व संचालक व भारतीय रंगभूमीवरील कलावंत ब.व.कारंथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व त्यांच्या नावाने २००४ पासून दिला जातो. वामन केंद्रे यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरील कार्य अजोड आहे. एनएसडीचे संचालक असताना, २०१८मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जगातील सर्वांत मोठा नाट्यमहोत्सव म्हणजेच ८वे थिएटर आॅलिम्पिक्सचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या स्तरावर असा महोत्सव आयोजित करण्याचा मान भारताला पहिल्यांदाच मिळाला. त्यांच्या या कार्याचा गौरव जगभरातून करण्यात आला. पन्नास वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या, उल्लेखनीय काम केलेल्या कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. ‘मनोहर सिंग स्मृती पुरस्कार’ हा आपल्या युवा माजी विद्यार्थ्यांच्या कामाचा सन्मान व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पन्नास वर्षांखालील माजी गुणी युवा विद्यार्थ्याला दिला जातो.
हा पुरस्कार २००४ रोजी वामन केंद्रे यांना मिळाला होता. केंद्रे हे उपरोक्त दोन्ही पुरस्कार मिळविणारे एनएसडीच्या इतिहासातील पहिले कलावंत आहेत. हा पुरस्कार या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत वितरित केला जाईल.

Web Title:  Vaman Kendra has been named as NSD's 'B' And Announced 'Karanth National Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.