वंचितची 2 पक्षांसोबत झाली युती, प्रकाश आंबेडकरांचं शिवसेनेलाही आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 04:02 PM2021-12-13T16:02:33+5:302021-12-13T16:07:26+5:30

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांचे लवकरच जागावाटप करण्यात येईल. उद्यापासूनच प्रचाराला सुरुवात होणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Vanchit bahujan aghadi formed an alliance with 2 parties, prakash Ambedkar's appeal to Shiv Sena too | वंचितची 2 पक्षांसोबत झाली युती, प्रकाश आंबेडकरांचं शिवसेनेलाही आवाहन

वंचितची 2 पक्षांसोबत झाली युती, प्रकाश आंबेडकरांचं शिवसेनेलाही आवाहन

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांवेळी एमआयएमसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबडेकर यांनी आता एमआयएमवर टीका केली आहे.

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळेच, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी वंचितची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. तसेच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत महत्त्वाची घोषणाही केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत वंचित बहुजन आघाडीची युती होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांचे लवकरच जागावाटप करण्यात येईल. उद्यापासूनच प्रचाराला सुरुवात होणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत. तसेच, शिवसेनेसोबतही युती करायला तयार आहोत. मात्र, शिवसेना आमच्यासोबत येईल का हा प्रश्न आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना या सेक्युलर पक्षासोबत युती करण्याची तयारी असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकांवेळी एमआयएमसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबडेकर यांनी आता एमआयएमवर टीका केली आहे.

राज्य सरकारकडून ओबीसींची फसवणूक 

राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. राज्य सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी आरक्षणासाठी लागू करण्यात आलेला वटहुकूम कोर्टात टिकणार नाही, हे राज्य सरकारला माहिती होते, तरी देखील त्यांनी वटहुकूम काढल्याचेही त्यांनी म्हटले.

Web Title: Vanchit bahujan aghadi formed an alliance with 2 parties, prakash Ambedkar's appeal to Shiv Sena too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.