मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळ झाली आहे, आज सकाळी मंत्रालया जवळ असलेल्या आमदार निवास जवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. या तोडफोड प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता आकाशवाणी आमदार निवास जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
'घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच...'; आरक्षणाच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
मिळालेली माहिती अशी, छत्रपती संभाजीनगर येथून हे आरोपी आल्याचे सांगण्यात आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी आकाशवाणी आमदार निवास जवळ पार्क केली होती. या दोन आंदोलकांसोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे, हे तिनही आंदोलक मुंबईत रेल्वेने आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफ म्हणाले, या तीन आंदोलकांवर कठोर कारवाई करु नका अशा सूचना मी आंदोलनकर्त्यांना दिल्या आहेत. हे आंदोलन शांततेत व्हायला पाहिजे, आमदारांची घरं जाळणं चुकीचं आहे. काही आमदारांनी बंदोबस्त घेतला आहे. मी मला बंदोबस्त घेतलेला नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.
जे करायचे ते करा, रात्रीपर्यंत ठोस निर्णय घ्या: मनोज जरांगे पाटील
आज शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. शासनाने शिंदे समितीचा अहवाल स्वीकारावा. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी.