Join us

वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 6:15 AM

वापी स्थानकावर अतिरिक्त थांब्यामुळे रेल्वेच्या इतर स्थानकांच्या वेळेत २६ ऑक्टोबरपासून बदल करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई सेंट्रल गांधीनगर कॅपिटल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला वापी स्टेशनवर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. वापी स्थानकावर अतिरिक्त थांब्यामुळे रेल्वेच्या इतर स्थानकांच्या वेळेत २६ ऑक्टोबरपासून बदल करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल- गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑक्टोबरपासून सकाळी ८.०४ वाजता वापी स्थानकावर पोहोचेल आणि ८.०६ वाजता सुटेल. तसेच सुरत स्थानकावर ट्रेन आता सकाळी ८.५० ऐवजी सकाळी ९.०० वाजता पोहोचेल. गाडी आता वडोदरा स्थानकावर सकाळी १०.१० ऐवजी आता सकाळी १०.१३ वाजता पोहोचेल. अहमदाबाद स्थानकाच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. 

तसेच गांधीनगर कॅपिटल- मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेसच्या अहमदाबाद आणि वडोदरा स्थानकांवरील (आगमन / प्रस्थान) कोणताही बदल होणार नाही; सुरत स्थानकावर गाडी आता संध्याकाळी ५.२३ ऐवजी संध्याकाळी ५.१० वाजता पोहोचेल. ही गाडी वापी स्थानकात संध्याकाळी ६.३८ वाजता पोहोचेल आणि ६.४० वाजता निघेल.

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेस