वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट...; मुंबई-शिर्डी, सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 06:21 AM2023-03-26T06:21:40+5:302023-03-26T06:22:00+5:30

सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील २७ हजार ५२० प्रवासी संख्येतून २.२३ कोटी रुपयांचा महसूल नोंदविला.

Vande Bharat Express Susat...; Mumbai-Shirdi, Solapur journey is preferred by more than lakhs of passengers | वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट...; मुंबई-शिर्डी, सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती

वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट...; मुंबई-शिर्डी, सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती

googlenewsNext

मुंबई :  सीएसएमटी- सोलापूर आणि सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला महिन्याभरात प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. एका महिन्यात दोन्ही वंदे भारत ट्रेनमधून तब्बल एक लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ८.६० कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वेला मिळाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 

सीएसएमटी- शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली. अवघ्या ३२ दिवसांच्या कालावधीत एक लाख २५९ प्रवाशांची वाहतूक केली आहे. त्यातून मध्य रेल्वेने ८.६० कोटींची महसूल गोळा केला आहे.  मुंबई -सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने सीएसएमटी, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील २६,०२८ प्रवासी संख्येतून २.०७ कोटी महसुलाची नोंद केली.  

सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील २७ हजार ५२० प्रवासी संख्येतून २.२३ कोटी रुपयांचा महसूल नोंदविला. साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील २३ हजार २९६ प्रवाशांच्या संख्येतून २.०५ कोटी रुपयांची महसुलाची नोंद केली. साईनगर शिर्डी - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून २३ हजार ४१५ प्रवाशांच्या संख्येतून २.२५ कोटी महसुलाची नोंद केली. देशभरात १० वंदे भारत ट्रेन -१५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली वंदे भारत ट्रेन रुळावर आली.

अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला ४ वर्षे पूर्ण झाली. आलिशान आणि उच्च दर्जाच्या सोयीसुविधांसह देशभरात आतापर्यंत १० वंदे भारत ट्रेन रुळांवर धावत आहेत. या ट्रेन्सची निर्मितीदेखील जलदगतीने सुरू आहे. या ट्रेनमुळे देशाच्या दळणवळण क्षेत्रात कमालीची क्रांती घडली आहे. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावलेल्या पहिल्या ट्रेननंतर सद्यस्थितीत १० ट्रेनद्वारे १७ राज्यातील १०८ जिल्हे वंदे भारत ट्रेनशी जोडले गेले आहेत.

Web Title: Vande Bharat Express Susat...; Mumbai-Shirdi, Solapur journey is preferred by more than lakhs of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.