Join us  

तीन नव्या मार्गांवर आज धावणार वंदे भारत एक्स्प्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 5:44 AM

कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांवर या नव्या वंदे भारत धावणार आहेत.

मुंबई : राज्यात आता तीन नव्या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. आज, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांवर या नव्या वंदे भारत धावणार आहेत.

पुणे, कोल्हापूर, हुबळी मार्गांवर धावणारी ८ डब्यांची वंदे भारत ट्रेन ही आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. नागपूर-सिकंदराबाददरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन २० डब्यांची असून ती सहा दिवस धावणार आहे. उद्घाटनानंतर कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापूरवरून, पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरून आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत नागपूरवरून ४:१५ वाजता सुटेल.

असे असेल वेळापत्रक

कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्यातून तीन दिवस) 

मार्ग कोल्हापूर-पुणे- प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि सोमवारी कोल्हापूरवरून सकाळी

८.१५ वाजता सुटेल.

पुणे -कोल्हापूर- १८ सप्टेंबरपासून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पुण्यावरून दुपारी सव्वादोन वाजता सुटेल.

थांबे: मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा.

पुणे-हुबळी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्यातून तीन दिवस)

मार्ग - पुणे - हुबळी -१९ सप्टेंबरपासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी पुण्यावरून दुपारी सव्वादोन वाजता सुटेल.

हुबळी-पुणे वंदे भारत -१८ सप्टेंबरपासून प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी रोज हुबळीवरून सकाळी ५.०० वाजता सुटेल.

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेसनरेंद्र मोदी