लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बुलेट ट्रेनसारखा आकार, वेगही अंमळ तिच्यासारखा, डब्यांची आगळीवेगळी रचना या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यातच उन्हाळा आल्याने या गाडीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसनी तब्बल तीन लाख १६ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
या मार्गांवर वंदे भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी-साईनगर शिर्डी, सोलापूर आणि नागपूर-बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या तिन्ही गाड्यांना उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. यामुळे रेल्वेच्या महसुलातदेखील भर पडत आहे.
साडेतीन महिन्यांत... मुंबई-साईनगर शिर्डीदरम्यान प्रवासी : १ लाख ६२ हजार ३२४ मुंबई -सोलापूरदरम्यान प्रवासी : १ लाख ५४ हजार ६४७ नागपूर-बिलासपूरदरम्यान : १ लाख ७४ हजार ४५०
मे महिना तुफान गर्दीचा...२ मे १५१.२४ टक्के प्रवासी१२ मे ११९.४५ टक्के प्रवासी१९ मे १३३.३९ टक्के प्रवासी२० मे १००.७९ टक्के प्रवासी२१ मे १०३.६३ टक्के प्रवासी २३ मे १३७.५४ टक्के प्रवासी