Join us  

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस उद्यापासून धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 10:09 PM

Vande Bharat Superfast Express : पश्चिम रेल्वे मार्गावर उद्यापासून (३० सप्टेंबर) मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार आहे.

नितीन जगताप

मुंबई - बहुप्रतिक्षित आणि नव्याने बनवलेली सेमी-हाय स्पीड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्सप्रेस आता धावण्यासाठी सज्ज आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्यापासून (३० सप्टेंबर) मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार आहे. या पहिल्या ट्रेनचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ट्रेनची नियमित सेवा १ ऑक्टोबर २०२२ पासून मुंबई सेंट्रल येथून सुरू होणार आहे. 

वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. ही पूर्णपणे एसी असणार आहे. त्यासोबतच स्लाइडिंग दरवाजे, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, मोबाइल चार्जिंग पॉइंट, अटेंडेंट कॉल बटन, बायो-टॉयलेट, स्वचालित  द्वार, सीसीटीवी कॅमेरे, रिक्लाइनिंग सुविधा, आरामदायक सीट असणार आहेत.  

नुकताच रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान रविवार सोडून दररोज धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी  सकाळी १०. ३० वाजता गांधीनगर येथून वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. प्रवाशांसाठी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस  अहमदाबाद  स्थानकावरून सकाळी १४. ०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १९.३५ वाजता पोहचले.

वेळापत्रक

मुंबई सेंट्रल येथून सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गांधीनगरला पोहचेल.  गांधीनगर येथून दुपारी १४.०५ वाजता सुटेल रात्री १९.३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहचेल  सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी धावणार आहे. 

तिकीट दर 

चेअर कार तात्पुरते भाडे (केटरिंग शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत- ६९० रुपये,  मुंबई सेंट्रल ते वडोदरा- ९०० रुपये ,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद - १०६० रुपये,  मुंबई सेंट्रल ते गांधीनगर -१११५ रुपये तर   एक्सकेटीव्ह क्लाससाठी तात्पुरते भाडे (खानपान शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत-१३८५ रुपये , मुंबई सेंट्रल ते वडोदरा - १८०५  रुपये ,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद-२१२० रुपये ,  मुंबई सेंट्रल ते गांधीनगर-  २२६० रुपये असणार आहे.

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेसनरेंद्र मोदी