छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतो आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या ट्रेनच्या आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवासी संख्या १०२ टक्के एवढी नोंदवली गेली आहे.
१४ लाख ३१ हजार ७५० प्रवाशांचे आरक्षण- सीएसएमटी स्थानकावरुन शिर्डी, सोलापूर, जालना आणि मडगाव या चार ठिकाणांसाठी वंदे भारत सुटते. ही ट्रेन मेल-एक्स्प्रेसच्या तुलनेत आरामदायक आणि वेगवान असल्याने प्रवाशांकडून तिला पसंती दर्शविण्यात येत आहे. - रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल ते १६ डिसेंबर या कालावधीत या चारही मार्गावर वंदे भारतच्या प्रवाशांसाठी एकूण १४ लाख ११ हजार सीट उपलब्ध झाल्या होत्या. त्यात टप्पानिहाय एकूण १४ लाख ३१ हजार ७५० प्रवाशांनी सीट बुक केली.
वंदे भारतने किती जणांनी केला प्रवासमार्ग (परतीसह)- एकूण प्रवासीसीएसएमटी ते शिर्डी- ४,५४,६९६सीएसएमटी ते सोलापूर- ८,४८,५८५सीएसएमटी ते जालना- २,५८,८३७सीएसएमटी ते मडगाव- १,६९,६३५