वंदे भारतचा वेग १३० किमी! स्लीपर ट्रेनची ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:35 IST2025-01-16T12:35:28+5:302025-01-16T12:35:44+5:30
शेवटची ही ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने रेल्वे सेफ्टी कमिशनर (सीआरएस) यांच्याकडून सर्टिफिकेट मिळण्यास मदत होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वंदे भारतचा वेग १३० किमी! स्लीपर ट्रेनची ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून बुधवारी, १५ जानेवारी रोजी दुपारी वंदे भारत स्लीपरच्या प्रोटोटाइप ट्रेनची ट्रायल रन घेण्यात आली. चाचणीदरम्यान ट्रेन १३० किमी प्रतितास वेगाने चालविण्यात आली. शेवटची ही ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने रेल्वे सेफ्टी कमिशनर (सीआरएस) यांच्याकडून सर्टिफिकेट मिळण्यास मदत होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई सेंट्रल स्टेशनच्या फलाट क्रमांक १ वर आलेली वंदे भारत स्लीपर अहमदाबादवरून आली होती. अहमदाबाद ते मुंबईदरम्यान या वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली. या ट्रेनची चाचणी राजस्थानच्या कोटामध्येदेखील घेण्यात आली होती. आता ट्रायल रन पूर्ण झाली असले तरी आतापर्यंत ट्रेनच्या मार्गाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु रेल्वेतील सूत्रांनी सांगितल्यानुसार ही वंदे भारत ट्रेन दिल्ली-मुंबई मार्गावर धावू शकते.
ब्रेल लिपीचा वापर
नियमित प्रवाशांसोबतच अंध प्रवाशांसाठीदेखील विशेष सोय केली असून, सीट नंबर आणि सर्व सूचना ब्रेल लिपीमध्येदेखील नमूद करण्यात आल्या आहेत.
१६ डब्यांची गाडी
वंदे भारत स्लीपरमध्ये १६ डबे होते. त्यापैकी ११ डब्बे एसी ३ टायर कोच, ४ डब्बे एसी २ टायर कोच आणि १ फर्स्ट एसी कोचचा समावेश होता.
क्षमता किती?
क्लास क्षमता
फर्स्ट एसी २४
सेकंड एसी ४८
थर्ड एसी ६७ (५ डब्यांमध्ये)
थर्ड एसी ५५ (४ डब्यांमध्ये)