मुंबईत धावणार ‘वंदे मेट्रो’..! २३८ लोकलसाठी एमआरव्हीसीने मागविल्या जागतिक निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 05:52 AM2023-06-22T05:52:12+5:302023-06-22T05:54:15+5:30

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू ...

'Vande Metro' to run in Mumbai..!, MRVC calls for global tenders for 238 locales | मुंबईत धावणार ‘वंदे मेट्रो’..! २३८ लोकलसाठी एमआरव्हीसीने मागविल्या जागतिक निविदा

मुंबईत धावणार ‘वंदे मेट्रो’..! २३८ लोकलसाठी एमआरव्हीसीने मागविल्या जागतिक निविदा

googlenewsNext

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने गेल्या  महिन्यात घेतल्यानंतर बुधवारी  मुंबई रेल्वे विकास महामंडळाने २३८ वंदे मेट्रोसाठी जागतिक निविदा काढल्या  आहे. २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.

मेड इन इंडियांतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनपाठोपाठ रेल्वे बोर्डाने वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वंदे मेट्रोला उपनगरी लोकल सेवा म्हणून चालविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या एमयूटीपी ३ आणि एमयूटीपी ३ अ अंतर्गत २३८ वंदे मेट्रो लोकलची खरेदी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मंजुरीही देण्यात आली होती. आता रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) भारतीय बनावटीच्या वंदे मेट्रोकरिता जागतिक  निविदा मागविल्या आहेत. येत्या दि. २९ सप्टेंबरपर्यंत निविदा भरता येणार आहेत.

२० हजार कोटी खर्च अपेक्षित
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहेत. यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या लोकलसाठी रेल्वे बोर्डाने गेल्याच महिन्यात मंजुरी दिली. त्यानंतर आता एमआरव्हीसीने निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली.

Web Title: 'Vande Metro' to run in Mumbai..!, MRVC calls for global tenders for 238 locales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो