Join us

वंजारपट्टी उड्डाणपूल मार्चमध्ये खुला

By admin | Published: February 27, 2015 10:42 PM

भिवंडी महानगरात होणारी वाहतूककोंडी संपुष्टात आणणारा आणि वाडा ते ठाणे रस्त्यावरील सुमारे ७९५ मीटर लांबीचा उड्डाणपूल तो मार्चमध्ये वाहतुकीसाठीही खुला होणार आहे.

स्रेहा पावसकर, ठाणेभिवंडी महानगरात होणारी वाहतूककोंडी संपुष्टात आणणारा आणि वाडा ते ठाणे रस्त्यावरील सुमारे ७९५ मीटर लांबीचा उड्डाणपूल तो मार्चमध्ये वाहतुकीसाठीही खुला होणार आहे. यामुळे भिवंडीतून जाणे अथवा येणे, यासाठी लागणारा सव्वा ते दीड तासाचा कालावधी अवघा अर्ध्या तासावर येणार आहे. तसेच हा प्रवास कोणत्याही गतिरोधक अथवा सिग्नलविना पार पडणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या इंधनाचीही बचत होणार आहे.या उड्डाणपुलाला दोन मार्गिका असून एका पुलावरून शिवाजी चौकाकडे येता येते. तर दुसरी मुंबई-नाशिक महामार्गाला जोडली आहे. त्यामुळे भिवंडी शहरातून नाशिक महामार्गाकडे आणि ज्यांना वाड्याहून ठाण्याकडे जायचे आहे, त्यांनाही तो सोयीस्कर ठरणार आहे. उड्डाणपुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणार असले तरी मार्गिकांचे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे. भिवंडीतील वाहतूककोंडीमुळे ४० टक्के बसेस या भिवंडीत न येता बायपासमार्गेच जातात. मात्र, या पुलामुळे कोंडी कमी झाल्यास या बसेसचा भिवंडीतील जाण्या-येण्याचा मार्ग मोकळा होईल. परिणामी, भिवंडीकरांना सद्य:स्थितीपेक्षा ४० टक्के अधिक बसेसची सेवा मिळू शकेल. या उड्डाणपुलामुळे भिवंडीतील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)