मिठाईमध्येही दिसतेय विविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 03:11 AM2016-10-11T03:11:39+5:302016-10-11T03:11:39+5:30

सणासुदीच्या काळात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरातील विक्रेत्यांनी मिठाईच्या दरात वाढ केली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या

Variety of dessert looks | मिठाईमध्येही दिसतेय विविधता

मिठाईमध्येही दिसतेय विविधता

googlenewsNext

नवी मुंबई : सणासुदीच्या काळात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरातील विक्रेत्यांनी मिठाईच्या दरात वाढ केली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध आकाराच्या मिठाईला यंदा मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाई, केशरी पेढे, काजुकतली, ड्रायफ्रूट मिठाई या मिठाईला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
शहरातील सर्वच मिठाईची दुकानेही सजविण्यात आली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध फ्लेवर्स आणि आकारात मिठाई उपलब्ध असून सफरचंद, कलिंगड, त्रिकोण, चौकोन आणि आयात अशा आकारातील मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दसऱ्यानिमित्त ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता त्यानुसार मोठ्या प्रमाणात मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असून माव्याच्या किमतीत वाढ झालेल्याने मिठाईच्या दरामध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी दिली आहे.
ड्रायफ्रूट मिठाई : ५८० रु. किलो, केशरी पेढे : ५६०, मावा पेढे : ५४०, काजू बर्फी : ७६० रुपये किलो, बालुशाही : ४९० रुपये किलो, बुंदी लाडू : ८८० रुपये किलो, काजुकतली : ८६० रुपये किलो, गुलाबजामुन : १५ ते २० रुपये प्रत्येकी, रसगुल्ला : १५ रुपये प्रत्येकी.

Web Title: Variety of dessert looks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.