Join us

यूएसए पेअर फळांच्या निरनिराळ्या प्रकारांनी ग्राहक सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 5:41 PM

ज्वालामुखीच्या मातीचे योग्य मिश्रण, डोंगरांतील स्वच्छ पाणी, उबदार वसंत ऋतू, उन्हाळी दिवस तसेच रात्रीचा गारवा या अनुकूल वातावरणामुळे जगातील सर्वोत्कृष्ट पेअर फळांचे उत्पादन होते.

मुंबई : नॅशनल पेअर (नासपती) मन्थ आणि भारतात सुरू असलेल्या #PearUpIndia मोहिमेच्या आनंदात भर म्हणून वरळीतील गोदरेज नेचर्स बास्केटच्या नवीन स्टोअरमध्ये मुंबईकरांना रसाळ आणि स्वादिष्ट यूएसए पेअर (नासपती) फळांची मेजवानी मिळणार आहे.यूएसए पेअर जगातील सर्वोत्कृष्ट पेअर्स आहेत. या फळांचे उत्पादन ओरेगॉन आणि वॉशिंग्टन येथे केले जाते. ज्वालामुखीच्या मातीचे योग्य मिश्रण, डोंगरांतील स्वच्छ पाणी, उबदार वसंत ऋतू, उन्हाळी दिवस तसेच रात्रीचा गारवा या अनुकूल वातावरणामुळे जगातील सर्वोत्कृष्ट पेअर फळांचे उत्पादन होते.आपल्या दैनंदिन आहारात पुरेसे फायबर असणे फार महत्वाचे आहे आणि फायबरमुळे पचनशक्ती वाढते हे सर्वज्ञात आहे. पेअरमधील फायबरमुळे पचनशक्ती वाढण्याबरोबरच शरीराला इतर कार्य करण्यास चालना मिळते. अनेक संशोधनांतून असे दिसून आले आहे की, कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यासाठी, हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी तसेच टाईप २ मधुमेह टाळण्यासाठी पेअर फळांचा उपयोग होतो. यूएसए पेअर फळांमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन 'सी' हे घटक आहेत आणि त्यात सोडियम किंवा चरबीयुक्त घटक नाहीत. त्यामुळे पेअर फळ निरोगी आहारासाठी एक आदर्श पर्याय आहे.गोदरेज नेचर्स बास्केटच्या व्यवस्थापकीय संचालक अवनी दावडा म्हणाल्या, "गोदरेज नेचर्स बास्केट हे ताजेपणा आणि मुबलकतेचे प्रतिक आहे. किरकोळ विक्रीतील अनुभव आणि आमची उत्पादने यामुळे ही प्रतिमा तयार करता आली आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणारे वरळीतील फ्लॅगशिप स्टोअर, 'डेली फूड डिलाईट्स' याचेच द्योतक आहे. आधुनिक ग्राहकांसाठी नैसर्गिक आणि जलद ऊर्जास्रोत असणाऱ्या यूएसए पेअर्ससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे."या प्रसंगी इंटरनॅशनल मार्केटिंग फॉर पेअर ब्यूरो नॉर्थवेस्टचे संचालक श्री. जेफ कोरिआ म्हणाले, " “भारतीय बाजारपेठ ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. गोदरेज नेचर्स बास्केटसह भागीदारी करून इथल्या चोखंदळ ग्राहकांसाठी पेअरसारखे उत्कृष्ट फळ उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरातील मीडिया आणि किरकोळ विक्रेत्यांसोबत भागीदारी करून अमेरिकन पेअर फळांचे आरोग्यदायी गुणधर्म भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल."यूएसए पेअरर्सबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या स्थानाबद्दल पुनरुच्चार करताना यूएसए पेअर्सचे भारतातील प्रतिनिधी श्री. सुमित सरण म्हणाले, "अमेरिकन पेअर्ससाठी भारतीय बाजारपेठ महत्वपूर्ण आहे. आपल्या ग्राहकांमध्ये आरोग्य आणि पौष्टिक अन्नाबद्दलची जागरुकता वाढत आहे आणि या स्वादिष्ट यूएसए पेअर फळांमुळे त्यांची फळांची टोपली नक्कीच परिपूर्ण होणार आहे."मुंबई, पुणे आणि बंगलोरमधील गोदरेज नेचर्स बास्केट स्टोअरमध्ये रंगीत, स्वादिष्ट आणि चवदार यूएसए पेअर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. ही फळे ऑर्डर करण्यासाठी www.naturesbasket.co.in वर क्लिक करा किंवा नेचर्स बास्केट या अँड्रॉइड आणि आयफोन मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे ऑर्डर करा.गोदरेज नेचर्स बास्केटबद्दल११९ वर्षांपासून स्थापन झालेल्या गोदरेज समूहाचे गोदरेज नेचर्स बास्केट हे भारतातील अग्रगण्य आणि प्रिमियम फूड डेस्टिनेशन आहे. त्यांची सुरुवात छोट्या प्रमाणात झाली - २००५ मध्ये त्यांनी मुंबईतील एका दुकानाने सुरुवात केली आणि आता ते स्वत: सर्व-किरकोळ व्यवसायात उतरले आहेत. गोदरेज नेचर्स बास्केटची दुकाने भारतभर आहेत, त्याचप्रमाणे वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातही ते अस्तित्वात आहेत.द पेअर ब्यूरो नॉर्थवेस्टओरेगॉन आणि वॉशिंग्टनमध्ये उत्पादित होणाऱ्या ताज्या पेअर फळांच्या विक्रीची बाजारपेठ वाढवण्यासाठी, प्रचार करण्यासाठी आणि विकसित बाजारपेठा शोधण्यासाठी १९३१ साली द पेअर ब्यूरो नॉर्थवेस्ट ही संस्था ना-नफा-ना-तोटा तत्वावरील मार्केटिंग एजन्सीच्या रूपात स्थापन करण्यात आली. या दोन्ही वायव्य राज्यांमधील पेअर्स यूएसए पेअर्सच्या लोगोअंतर्गत वितरीत करण्यात येतात. ओरेगॉन आणि वॉशिंग्टन दोन्ही राज्ये अमेरिकेतील सर्वात मोठे पेअर्स उत्पादक प्रदेश आहेत. संपूर्ण अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या पेअर्सच्या ८४ टक्के पेअर्स आणि अमेरिकेच्या ताज्या पेअर्सच्या निर्यातीच्या ९२ टक्के पेअर्सचे उत्पादन या दोन राज्यात घेतले जाते. द पेअर ब्यूरो नॉर्थवेस्टचे प्रतिनिधित्व करीत १६०० उत्पादक, ७३ निर्यातदार (पॅकर्स आणि शिपर्स) जागतिक बाजारपेठेत सर्वोत्तम यूएसए पेअर्स पोहोचवीत असल्याचा सार्थ अभिमान बाळगतात. गुडगावमधील एस. एस. असोसिएट्स ही फूड मार्केटींग संस्था भारतात पेअर ब्यूरो संस्थेचे प्रतिनिधित्व करते.