रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:08 AM2021-09-22T04:08:34+5:302021-09-22T04:08:34+5:30

मुंबई : रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) मंगळवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या स्थापना दिनानिमित्त येत्या आठवड्यात स्वच्छता अभियान, ...

Various activities on the occasion of the establishment day of Railway Security Force | रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम

रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थापना दिवसानिमित्त विविध उपक्रम

Next

मुंबई : रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) मंगळवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या स्थापना दिनानिमित्त येत्या आठवड्यात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, चर्चासत्रे, वादविवाद, चर्चा, कौटुंबिक बैठक, क्रीडा/खेळ उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वे आरपीएफने रेल्वे मालमत्ता, प्रवासी आणि प्रवासी क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाय केले आहेत. गेल्या वर्षभरात म्हणजे सप्टेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत मध्य रेल्वे आरपीएफने रेल्वे मालमत्तेच्या चोरीची ३२७ प्रकरणे आणि चोरीतील ३४.०३ लाख रुपयांची मालमत्ता शोधली. या व्यतिरिक्त बेकायदा प्रवास करणाऱ्या २९,४८६ व्यक्तींविरोधात रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरपीएफने विनातिकिट प्रवाशांविरुद्ध तपासणी करण्यासाठी वाणिज्यिक विभागाला मदत केली आहे. आरपीएफने १२३ चोरट्यांना पकडून शासकीय रेल्वे पोलिसांना सोपवले आहे आणि ६४ दरोड्यांच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे. आरपीएफने मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख रकमेसह मौल्यवान वस्तूही प्रवाशांना परत केल्या आहेत. आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ४३ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

एनडीपीएस कायद्यांतर्गत ५९ प्रकरणांत आरपीएफने गांजा, सिगारेट, दारू इत्यादी प्रतिबंधित वस्तू जप्त करून संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आरपीएफने ७ अपहरणकर्ते, ३ विनयभंग करणारे, ३ मारेकरी आणि राज्य पोलिसांचे १० इतर वॉन्टेड गुन्हेगारही पकडले आहेत. महिला प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी ‘मेरी सहेली’ योजनादेखील सादर केली आहे.

Web Title: Various activities on the occasion of the establishment day of Railway Security Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.