संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्राण्यांची नोंद
By admin | Published: May 17, 2017 05:19 AM2017-05-17T05:19:57+5:302017-05-17T05:21:16+5:30
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नुकतेच वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेनुसार, उद्यानात चितळ, भेकर, लंगूर
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नुकतेच वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेनुसार, उद्यानात चितळ, भेकर, लंगूर, घोरपड, ससा, मुंगूस यांच्यासह बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गणनेनुसार, सात बिबट्यांची नोंद झाली असून, १२४ वटवाघळांची नोंदी झाल्या आहेत. बुद्धपौर्णिमेला राष्ट्रीय उद्यानात पाणवठ्यांवर झालेल्या नोंदींमध्ये या वर्षी ७ बिबटे आढळले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० आणि ११ मे रोजी उद्यानातील वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. ही गणना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह तुंगारेश्वर अभयारण्याच्या रेंजमध्ये करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या नोंदीत वाढ झाली असून, ७ बिबट्यासह ३९२ चितळ, ३७ सांबर, ३२ रानडुकरांची नोंद झाली आहे. बिबट्यांबाबत अधिक माहिती देताना, प्रशासनाने सांगितले की, गणनेदिवशी पाणवठ्यावरील वन्यप्राणी सर्वेक्षणामध्ये एकूण ७ बिबटे आढळून आले आहेत.
२०१७
बिबट्या ७
चितळ ३९२
सांबर ३७
रानडुक्कर ३२
लंगुर ८६
रानकोंबडी २८
लालतोंडी माकड १७४
वटवाघूळ १२४
रानमांजर 0९
मुंगूस १९
मोर/लांडोर 0३
इतर ११२
२०१६
बिबट्या ९
चितळ ११५
सांबर ३१
रानडुक्कर ३४
भेकर 0४
चौशिंगा 0५
लंगुर ६२
रानकोंबडी0७
लालतोंडी माकड १७३
घोरपड 0३
ससा0५
वटवाघूळ ६९
रानमांजर १२
मुंगूस १९
मोर/लांडोर 0४
इतर १०८