Join us

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्राण्यांची नोंद

By admin | Published: May 17, 2017 5:19 AM

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नुकतेच वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेनुसार, उद्यानात चितळ, भेकर, लंगूर

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नुकतेच वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेनुसार, उद्यानात चितळ, भेकर, लंगूर, घोरपड, ससा, मुंगूस यांच्यासह बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गणनेनुसार, सात बिबट्यांची नोंद झाली असून, १२४ वटवाघळांची नोंदी झाल्या आहेत. बुद्धपौर्णिमेला राष्ट्रीय उद्यानात पाणवठ्यांवर झालेल्या नोंदींमध्ये या वर्षी ७ बिबटे आढळले आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० आणि ११ मे रोजी उद्यानातील वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. ही गणना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह तुंगारेश्वर अभयारण्याच्या रेंजमध्ये करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या नोंदीत वाढ झाली असून, ७ बिबट्यासह ३९२ चितळ, ३७ सांबर, ३२ रानडुकरांची नोंद झाली आहे. बिबट्यांबाबत अधिक माहिती देताना, प्रशासनाने सांगितले की, गणनेदिवशी पाणवठ्यावरील वन्यप्राणी सर्वेक्षणामध्ये एकूण ७ बिबटे आढळून आले आहेत.२०१७ बिबट्या ७चितळ ३९२सांबर ३७रानडुक्कर ३२लंगुर ८६रानकोंबडी २८लालतोंडी माकड १७४वटवाघूळ १२४रानमांजर 0९मुंगूस १९मोर/लांडोर 0३इतर ११२२०१६ बिबट्या ९चितळ ११५सांबर ३१रानडुक्कर ३४भेकर 0४चौशिंगा 0५लंगुर ६२रानकोंबडी0७लालतोंडी माकड १७३घोरपड 0३ससा0५वटवाघूळ ६९रानमांजर १२मुंगूस १९मोर/लांडोर 0४इतर १०८