मागाठाणेच्या विविध समस्या लागणार मार्गी
By मनोहर कुंभेजकर | Published: June 5, 2023 07:56 PM2023-06-05T19:56:28+5:302023-06-05T19:58:45+5:30
आमदार प्रकाश सुर्वे यांची पालिका आयुक्तांसमवेत झाली सकारात्मक बैठक
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागाठाणे येथील नॅशनल पार्क जवळील श्रीकृष्ण नगर नदीवरील पूलाची एक लेन गेल्या मार्च मध्ये सुरू झाली होती.आता दुसरी लेन सुरू होण्यासाठी वन खात्याची एनओसी आवश्यक आहे.त्यामुळे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे बैठक आयोजित करून या पूलाला एनओसी मिळेल असे आश्वासन आज मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आज पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह यांना दिले.तर सदर एनओसी मिळताच या पूलाच्या कामाला पालिका प्रशासन लगेच सुरवात करेल असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आणि या पूलाच्या उदघाटन सोहळ्याला येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.
आज दुपारी पालिका मुख्यालयात मागाठाणेच्या विविध समस्यांबाबत आमदार प्रकाश सुर्वे आणि पालिका आयुक्तांबरोबर संयुक्त बैठक झाली.यावेळी चौगुले नगर येथील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ११ झोपडपट्टीवासियांना पीएपी योजने अंतर्गत त्यांचे पुनर्वसन करण्याचे आणि चौगुले नगर येथील रस्ता रुंदीकरण करण्याचेपालिका आयुक्तांनी आदेश दिले.
दहिसर पूर्व रावळपाडा येथील नागरिकांना 148 चाचण्या मिळण्यासाठी पॉलिक्लिनिक सुरू करून करण्याची मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी पालिका आयुक्तांकडे केली.याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकर डॉक्टरांची नियुक्ती व सेवा सुविधा उपलब्ध करून सदर पॉलिक्लिनिक सुरू करणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले. बोरिवली पूर्व येथील धीरज रिजन्सी या सोसायटीला अजून ताबा प्रमाणपत्र मिळालेले नाही,त्याची अँमिन्सेटी योजने अंतर्गत लवकर पूर्तता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स येथील महालक्ष्मी उद्यानात सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी शौचालयाची उपलब्ध करण्याची मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी करताच आयुक्तांनी याची पूर्तता करण्याचे आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निर्देश दिले. एकंदरीत आज पालिका आयुक्तांची बैठक सकारात्मक झाली आणि आज घेतलेले सर्व विषय लवकर मार्गी लागतील असा विश्वास आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला. या बैठकीला सहआयुक्त चंद्रशेखंर चौरे,प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड,परिमंडळ ७ च्या उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे पालिका उपायुक्त (उद्यान) किशोर गांधी, वन विभागाच्या उपवन अधिक्षक रेवती कुलकर्णी,आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित तळेकर,आर मध्य
विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर,आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नवशिश वेंगुर्लेकर व इतर अधिकारी तसेच उपविभागप्रमुख राजेश कासार,विधानसभा संघटक अमोल विश्वासराव,शाखाप्रमुख सुभाष येरुणकर,कार्यालयप्रमुख संतोष दावडे,शांताराम काते आणि पदाधिकारी उपस्थित होते.