- विशेष प्रतिनिधी ।मुंबई : राज्यातील हजारो चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी २७ सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाऊसाहेब पठाण यांनी माहिती दिली.चतुर्थश्रेणी कर्मचाºयांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्य केल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष काहीही केले नाही. गेल्या आठवड्यात कर्मचाºयांनी दोन दिवसांचा संप करुनही सरकार ढिम्मच राहिले. त्यामुळेच आता बेमुदत संपाशिवाय पर्याय नसल्याचे पठाण यांनी सांगितले.अनुकंपा तत्वावरील सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कामगार निवृत्त झाल्यानंतर त्याच्या एका पाल्यास शासकीय सेवेत नोकरी मिळावी, सर्व खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची पदे तत्काळ भरावीत, या कर्मचाºयांना शासकीय वसाहत गृह खात्याप्रमाणे बांधून द्यावी, चतुर्थश्रेणीतून तृतीय श्रेणीत २५ ऐवजी ५० टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नये, सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा या मागण्यांसाठी संप असेल.
चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचा विविध मागण्यांसाठी उद्यापासून बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 2:22 AM