मुंबई : मध्य रेल्वेने रविवारी मुख्य मार्गावरील माटुंगा-मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर आणि कुर्ला-वाशी अप व डा६उन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला. या दरम्यान अनेक देखभाल दुरुस्ती कामे करण्यात आली आहे. रेल्वेने मेगाब्लॉकच्या काळात ४५ मीटर रूळ बदलणे, पॅकिंग व पॉइंट्सची फिटिंग, एसईजे स्लीपर्सची बदलणे, ड्युओमॅटिक मशीनद्वारे २.२ किमी टॅपिंगचे काम तसेच वेल्डिंगचे काम, बॉक्सिंग आणि ४५० मीटर गिट्टीचे कामही हाती घेण्यात आले. ३०० मीटर सेंटर ड्रेन साफ करण्याचे कामही करण्यात आले तसेच २.१५ कि.मी. ओएचईची वार्षिक ओव्हरहॉलिंग, संपर्क तारांचे स्ट्रेससह १.५३ किमी ओएचईची तपासणी, १०० मीटर कॉन्टॅक्ट वायर्स, ४ फ्लॅश इन्सुलेटर आणि ३८ ड्रॉपर बदलण्यात आले. याशिवाय इतर अनेक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात आली.
मध्य रेल्वेची मेगा ब्लॉकमध्ये विविध देखभाल दुरुस्तीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:07 AM