मेगा ब्लॉकमध्ये विविध देखभाल-दुरुस्तीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:51+5:302021-01-08T04:13:51+5:30
मुंबई : रविवारी माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ...
मुंबई : रविवारी माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे अप व डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. या काळात देखभाल-दुरुस्तीचे कामे करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे हार्बर मार्गावर रेल्वे १ किमी रुळाचे नूतनीकरण आणि १.०५ किमी रुळाचे फिटिंग नूतनीकरणाचे काम करण्यात आले. २६० मीटर पॅनेलचे ४ संच बदलले. १.०५२ किमी लांबीच्या ट्रॅकचे ग्रीझिंग, २ लेवल क्रॉसिंग गेटची ओव्हरहाऊलिंग, ६० किलो वेल्डिंगचे काम तसेच सुमारे १०० घनमीटर कचरा गोळा करण्यात आला. ८५ पॉइंटस आणि क्रॉसिंग स्लीपर रिलीज करण्यासह गटार आणि सेसची साफसफाई केली, १.५ किमी क्रिब भरणे आणि ओव्हरहेड गिट्टीची क्लिअरन्स, ६४ प्लेन ट्रॅक स्लीपर बदलले, १३०० मीटर ट्रॅकची टम्पिंग करणे आणि २९ पॉइंटवर अल्ट्रासोनिक दोष शोधणी चाचणी करण्यात आली.
केटॅनरी व कॉन्टॅक्ट वायरची टर्मिनेशन शिफ्टिंग ४ ठिकाणी करण्यात आली, २ ठिकाणी कट इन्सुलेटर प्रदान करण्यात आले; ३५०मीटर अनावश्यक कॅटेनरी आणि कॉन्टॅक्ट वायर काढले; ५५० मीटर वार्षिक ओव्हरहॉलिंग, २ क्रॉस ओव्हर; ५५० मीटर ट्रॅक ओएचईची सखोल तपासणी; ८ मास्टस तोडण्यात आली; एसी / डीसी ब्राकेट असेंब्ली ६ ठिकाणी उभारली आणि ३ डीसी ब्राकेट असेंब्ली काढून टाकण्यात आली; ४ स्ट्रक्चर्सची सिल्वर पेंटिंग; २४ स्पान ड्रोपिंग करण्यात आले; ३४ ठिकाणी वृक्षतोड / छाटणीचे कामही करण्यात आले; ३० बाँडचे तोडणे व पुन्हा जोडण्याची काम केले गेले. ही कामे एक क्रेन, दोन टॉवर वॅगन्स आणि आठ ट्रॅसल / शिडीच्या टीमसह केली गेली.
पॉइंटच्या ठिकाणी मोटार, घर्षण क्लच आणि डिटेक्टर ट्रॉली बदलली आणि चाचणी केली; रावली जंक्शन येथील सिग्नलचा टायमर बदलला; डिजिटल एक्सल काउंटर सेन्सरचे डिस्कनेक्शन आणि जोडणीचे कार्य; १०४० मीटरचे रूळ नूतनीकरण केले आणि ७.१ मिमी रुंदीची ६४ छिद्रे, १६ मिमी रुंदीची १२ छिद्रे आणि ५ नग डिजिटल एक्सेल काउंटर सेन्सर पुन्हा फिट करण्यात आली.