गोरेगावात कृषी कायद्याच्या विरोधात मुंबई फेरीवाला सेनेसह विविध पक्षीय निदर्शने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:05 AM2020-12-09T04:05:01+5:302020-12-09T04:05:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर दिला. आज गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाला सेना व हॉकर्स संघटनेसह विविध पक्षीय नेते, कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी एकत्र येत कृषी कायद्याच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणांनी गोरेगाव स्टेशन दणाणून सोडला.
यावेळी शेतकऱ्यांना शेतमजूर बनविणाऱ्या कायद्याला तीव्र विरोध करणार असून, शेतकऱ्यांच्या विरोध असणाऱ्या आणि भांडवलदारांना मदत करणाऱ्या कायद्याचे नेहमीच विरोध केला जाईल व सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी शिवसेना नेहमीच उभी असेल, असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते, आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी केले.
यावेळी आमदार सुनील प्रभू यांच्यासह मुंबई फेरीवाला सेनेचे अध्यक्ष अशोक देहरे, उपविभाग प्रमुख सुधाकर देसाई, आरपीआय, सीपीएम्, हॉकर्स संघटना यांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.
------------------------------