नागरी प्रश्नांना पूर्ण करण्याची वर्षा गायकवाड यांच्या 'न्यायपत्रा'तून हमी! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:31 PM2024-05-16T23:31:56+5:302024-05-16T23:33:04+5:30

उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन

Varsha Gaikwad's 'Nyaypatra' guarantee to solve civil problems! | नागरी प्रश्नांना पूर्ण करण्याची वर्षा गायकवाड यांच्या 'न्यायपत्रा'तून हमी! 

नागरी प्रश्नांना पूर्ण करण्याची वर्षा गायकवाड यांच्या 'न्यायपत्रा'तून हमी! 

- श्रीकांत जाधव

मुंबई : मोकळ्या जागांचे संवर्धन, कुर्ला मदर डेरी, विमानतळ फनेल झोन, लोकलमधील गर्दी, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा दर्जा, तीन महिन्यातून एकदा जनसुनवाई, गावठाण.  कोळीवाडा, अशा उत्तर मध्य मुंबईतील प्रलंबित नागरी प्रश्नांना प्राधान्याने पूर्ण करण्याची हमी 'न्यायपत्रा'तून महाविकास आघाडीने दिली आहे. 

उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार, यासाठीचे न्यायपत्र गुरुवारी सादर केले. त्याचे प्रकाशन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना चेन्नीथला यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात मोदी हिंदू, मुस्लिम, पाकिस्तान यावरच बोलत आहेत. त्यांचे शिक्षण कमी असल्याने बजेटची त्यांना माहिती नाही. त्यामुळे बजेटवर ते काहीही बोलत आहेत. परंतु जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही.

वर्षा गायकवाड लढवय्या नेत्या आहेत. मुंबईकरांच्या प्रश्नाची त्यांना चांगली जाण आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयी करुन संसदेत पाठवा, मुंबईकरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी त्या कट्टीबद्ध आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. तसेच गायकवाड यांच्या हमी पत्रात हाऊसिंग सोसायट्यांवर लावलेला अन्यायकारक जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबईत प्रदुषण समस्या असून त्यावर उपाय योजना करण्यावरही भर दिला जाईल, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, सचिव बी. एम. संदीप, आमदार अमिन पटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कळीचे प्रश्न जाहीरनाम्यात टाळले
गायकवाड यांच्या न्यायापत्रात उत्तर मध्य मुंबईतली वादाच्या प्रश्नाचा अभाव आहे. त्यात पूनम महाजन यांना त्रासदायक ठरलेले संरक्षण जमिनीचा प्रश्न, एअर पोर्ट जमिनीवरील घराचा प्रश्न, मिठी नदी, मुस्लिम बहुल पट्ट्यात रखडलेले झोपु प्रश्न यावर जाहीरनाम्यात भाष्य नाही. 

Web Title: Varsha Gaikwad's 'Nyaypatra' guarantee to solve civil problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.