हे धाडस सिनेमापर्यंतच ठेव, वरूण धवनला मुंबई पोलिसांचा 'डोस'
By sagar sirsat | Published: November 23, 2017 11:41 AM2017-11-23T11:41:28+5:302017-11-23T18:02:30+5:30
हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ...''
मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याला मुंबई पोलिसांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर गाडीतून प्रवास करत असताना त्याने रिक्षातून प्रवास करणा-या एका फॅनसोबत सेल्फी काढला होता. सेल्फी काढतानाचा हा फोटो एका इंग्रजी वृत्तपत्राने छापला. तो फोटो ट्विट करून मुंबई पोलिसांनी वरूण धवनला झापलं आहे. या शिवाय त्याला इ-चलान देखील आकारण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या ट्विटला उत्तर देत अभिनेता वरुण धवनने पोलिसांची माफी मागत यापुढे सुरक्षेच्या दृष्टीनं आधी विचार करेन असं म्हटलं आहे.
इंग्रजी वृत्तपत्र मिड-डेने वरूण धवनचा एक सेल्फी छापला होता. यामध्ये तो भररस्त्यात आपल्या गाडीच्या खिडकीतून डोकावून बाजूच्या रिक्षातून प्रवास करणा-या एका आपल्या फॅनसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी हा फोटो ट्विट करून वरूणला खडेबोल सुनावले आहेत.
''हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ...'' अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांनी वरूण धवनला डोस दिला आहे.
.@Varun_dvn These adventures surely work on D silver screen but certainly not on the roads of Mumbai! U have risked ur life,ur admirer’s & few others. V expect better from a responsible Mumbaikar & youth icon like U! An E-Challan is on d way 2 ur home. Next time, V will B harsher pic.twitter.com/YmdytxspGY
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 23, 2017