मुंबई : मुंबई विभागातील वसई रोड - दिवा - पनवेल विभागांवरील मेमू सेवा २४ सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे. सध्या मुंबई विभागात ईएमयू उपनगरीय सेवांसाठी बंधनकारक असलेले कोरोनाचे नियम मेमू सेवांकरिता तिकीट/पास जारी करण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी बंधनकारक असणार आहेत.
दिवा-वसई रोड विभागातील पहिली गाडी दिवा येथून ०५.४९ वा. प्रस्थान, वसई रोड येथे ०६.४५ वा. आगमन होणार आहे. वसई रोड येथून ०९.५० वा. प्रस्थान, दिवा येथे १०.५० वा. आगमन, दिवा येथून ११.३० वा. प्रस्थान, वसई रोड येथे १२.३० वा. आगमन, वसई रोड येथून १२.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १३.५५ वा. आगमन, दिवा येथून १४.३३ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १५.२५ वा. आगमन, वसई रोड येथून १५.५५ वा. प्रस्थान, दिवा येथे १६.५५ वा. आगमन, दिवा येथून १७.५५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १८.५५ वा. आगमन, वसई रोड येथून १९.१५ वा. प्रस्थान, दिवा येथे २०.०७ वा. आगमन होणार आहे.
पनवेल - दिवा - वसई रोड विभाग (शनिवार आणि रविवार वगळता) पनवेल येथून ०८.२५ वा. प्रस्थान दिवा येथे ०९.१० वा. आगमन, दिवा येथून ०९.२५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १०.०५ वा. आगमन, पनवेल येथून १०.३० वा. प्रस्थान दिवा येथे ११.१० वा. आगमन, दिवा येथून ११.२० वा. प्रस्थान, पनवेल येथे १२.०१ वा. आगमन, पनवेल येथून १२.१० वा. प्रस्थान दिवा येथे १२.५० वा. आगमन, दिवा येथून १६.२५ वा. प्रस्थान, वसई रोड येथे १७.२५ वा. आगमन , वसई रोड येथून १७.३५ वा. प्रस्थान, दिवा येथे १८.३५ वा. आगमन , दिवा येथून १८.४५ वा. प्रस्थान, पनवेल येथे १९.२५ वा. आगमन होणार आहे.