वसईत सात पोलिस ठाण्यात 'महिलाराज'

By admin | Published: March 9, 2017 01:09 AM2017-03-09T01:09:05+5:302017-03-09T01:09:05+5:30

जागतिक महिला दिनानिमित्ताने वसईतील सातही पोलीस ठाण्याचा कार्यभार तेथील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला होता.

Vasai Saty police station's 'Mahilaraj' | वसईत सात पोलिस ठाण्यात 'महिलाराज'

वसईत सात पोलिस ठाण्यात 'महिलाराज'

Next

वसई : जागतिक महिला दिनानिमित्ताने वसईतील सातही पोलीस ठाण्याचा कार्यभार तेथील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला होता. यावेळी पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहून त्यांना साथ दिली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अप्पर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी ही संकल्पना राबवली होती. वसईतील चारही पोलीस ठाण्याचा कारभार एका दिवसासाठी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे सोपवला होता. प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्या-त्या पोलीस ठाण्याचे प्रमुख नेमण्यात आले होते. पुरुष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहाय्यकाची भूमिका बजावली होती. त्यामुळे दिवसभर सर्वच पोलीस ठाण्यात एक वेगळेच वातावरण पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Vasai Saty police station's 'Mahilaraj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.