वसई - विरार मॅरेथॉन १० डिसेंबरला रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:32 AM2017-10-05T02:32:12+5:302017-10-05T02:32:32+5:30
भारतातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी वसई - विरार महापौर मॅरेथॉन आगामी १० डिसेंबरला रंगेल. सातवे वर्ष असलेल्या यंदाच्या स्पर्धेत एकूण १६ हजार धावपटूंचा सहभाग होईल
मुंबई : भारतातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी वसई - विरार महापौर मॅरेथॉन आगामी १० डिसेंबरला रंगेल. सातवे वर्ष असलेल्या यंदाच्या स्पर्धेत एकूण १६ हजार धावपटूंचा सहभाग होईल, अशी माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.
बुधवारी मुंबईत मराठी पत्रकार संघ येथे वसई - विरार महानगरपालिकेच्या महिला महापौर प्रविणा ठाकूर यांनी स्पर्धेची माहिती दिली. वसई - विरार महानगरपालिका आणि वसई तालुका कला - क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने होणाºया या स्पधेर्तून स्त्रीभ्रूण हत्या टाळा व निसगार्चा नियम पाळा असा सामाजिक संदेश देण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेसाठी क्रीडा निवेदिका मंदिरा बेदी आणि भारताचा माजी रग्बी कर्णधार व अभिनेता राहुल बोस यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले आहे.
दोन प्रमुख गटात होणाºया या स्पर्धेत पुर्ण मॅरेथॉन आणि अर्ध मॅरेथॉन अशा पुरुष व महिलांच्या शर्यती होतील. यंदाही राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवलेल्या दिग्गज धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. यामध्ये, रशपाल सिंग, बलिअप्पा ए. बी. आणि संजीवनी जाधव या प्रमुख धावपटूंचा समावेश आहे. तसेच, अनेक मॅरेथॉन गाजवलेल्या दीपचंद, लिंगखोई बिनिंग, रामसिंग यादव, इलाम सिंग, नीरज पाल सिंग, खेता राम, संवरु यादव, नितेंदर सिंग रावत, जी. लक्ष्मणन, राहुल पाल, बी.सी. तिसक, सोजी मॅथ्यू यांनीही आपला सहभाग निश्चित केला आहे. महिलांमध्ये कविता राऊत, सुधा सिंग, ललिता बाबर, मोनिका आथरे, मोनिका राऊत आणि प्रियांका सिंग यांचा सहभाग मिळाल्याने जेतेपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळेल. एकूण ३५ लाख रक्कमेची रोख पारितोषिके असलेल्या या स्पर्धे च्या अधिकृत संकेतस्थळावर २३ आॅक्टोबरपासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रीया सुरु होईल, असेही आयोजकांनी यावेळी संगितले.