वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा गौरव

By admin | Published: June 10, 2017 01:23 AM2017-06-10T01:23:49+5:302017-06-10T01:23:49+5:30

सायन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग या संस्थेला २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत अनेक

Vasantdada Patil Pratishthan's pride | वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा गौरव

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग या संस्थेला २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. एस्टर्ड एज्युकेशनकडून बेस्ट इंजिनीअरिंग कॉलेज आॅफ द इयर, प्रॅक्सिस मीडिया प्रायव्हेड लिमिटेडकडून बेस्ट इंजिनीअरिंग कॉलेज इन मुंबई, इंडो-ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्कील्स समिट अ‍ॅण्ड एक्स्पोकडून (अमेरिका) एज्युकेशनल एक्सलन्स अशा पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे सरचिटणीस अ‍ॅड. आप्पासाहेब देसाई यांना एस्टर्ड एज्युकेशनकडून (सिंगापूर) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंडो-ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्कील्स समिट अ‍ॅण्ड एक्स्पोकडून (अमेरिका) आप्पासाहेब देसाई यांना ‘प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ’ म्हणून गौरविण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलम एन शेख यांना प्रॅक्सिस मीडिया प्रायव्हेड लिमिटेडकडून यंग अचिव्हर आॅफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. इंडो-ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्कील्स समिट अ‍ॅण्ड एक्स्पोकडूनही डॉ. अलम एन शेख यांचा एज्युकेशन लीडरशिप पुरस्काराने
गौरविण्यात आले आहे. असे विविध पुरस्कार प्राप्त झाल्याने प्रतिष्ठानची मान उंचावली
आहे. मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे.

Web Title: Vasantdada Patil Pratishthan's pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.