नवी मुंबई : वाशी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला आहे. याचवेळी घरातील व्यक्ती घरी परत आल्याने चोरटय़ांना पळ काढावा लागला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाशी सेक्टर 15 येथील दत्तगुरुनगर अपार्टमेंटमध्ये राहणा:या अर्चना जाधव यांच्या घरी ही घटना घडली. बुधवारी दुपारी अर्चना ह्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेल्या असता दोन चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. परंतु चोरीच्या प्रय}ात असतानाच अर्चना या मुलांना घेवून घरी परतल्या. घराचे कुलूप उघडे असल्याचे पाहून घरात त्यांचे पती असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी दरवाजा ठोकला असता घरातून एक महिला व एक पुरुष बाहेर आले. या दोघांनी अर्चना यांना धक्का देवून पळ काढण्याचा प्रय} केला. यावेळी अर्चना यांनी आरडाओरडा करून शेजा:यांना मदतीसाठी बोलावले. त्याचवेळी इमारतीच्या सुरक्षा रक्षकानेही या दोघांना पकडण्याचा प्रय} केला. परंतु इमारतीखालीच उभ्या असलेल्या टॅक्सीमधून त्यांनी पळ काढला. या प्रकारावरून घरफोडीच्या टोळ्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे दिसून आले आहे. या प्रकारात घरातील 5 हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. या टोळीने सदर घरावर पाळत ठेवून तेथे चोरीचा प्रय} केला असावा अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तर सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरे व टॅक्सी क्रमांक याद्वारे आरोपींचा शोध घेतला जाणार असल्याचे देखील पाठारे यांनी सांगितले. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)