दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:31 AM2020-01-05T05:31:59+5:302020-01-05T05:32:10+5:30

राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे.

Vasudev Gayatte Kala Jeevan Gaurav Award for Senior Artist Contributing to the Field of Visualization | दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’

दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’

Next

मुंबई : राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील पहिली संस्था सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या रूपात मुंबईत स्थापन झाली. राज्यातील कलाकारांनी कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त केला आहे. त्यानुसार, दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यात दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असणार आहे. हा पुरस्कार दृश्यकलेच्या एका ज्येष्ठ व नामवंत कलाकार यांना दरवर्षी, क्रमनिहाय प्रदान करण्यात येईल. त्यात अनुक्रमे रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला आणि कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातूकाम) या विभागांचा समावेश आहे. या क्रमनिहाय येणाºया संबंधित कला विभागात पुरस्कारासाठी कलाकार यांची निवड न झाल्यास त्यानंतरच्या क्रमावरील विभागातील कलाकारांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल, असे निर्देश शासन निर्णयात नमूद आहेत.
या पुरस्काराकरिता शोध समिती व राज्यस्तरीय निवड समिती यांची रचना करण्यात आली आहे. या समितीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री अध्यक्षस्थानी असतील, तर त्यांच्याअंतर्गत विभागाचे राज्यमंत्री, विभागाचे अपर मुख्य सचिव वा प्रधान सचिव आणि राज्याच्या कला संचालनालयाचे कला संचालक यांचा समावेश असेल.

Web Title: Vasudev Gayatte Kala Jeevan Gaurav Award for Senior Artist Contributing to the Field of Visualization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.