Join us

व्यसनमुक्तीसाठी सामाजिक संस्था एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:37 AM

व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने १ आॅगस्टला आझाद मैदानात धरणे आंदोलनाची हाक

मुंबई : व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने १ आॅगस्टला आझाद मैदानात धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य शासनाने ७ जून रोजी काढलेले परिपत्रक रद्द करण्याची मंचाची प्रमुख मागणी आहे.राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५०० मीटर व १० हजारांपेक्षा जास्त वस्तीच्या गावांपासून २२० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र राज्य शासनाने ७ जूनला काढलेल्या परिपत्रकात दारू दुकाने वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा आदेश बिनशर्त मागे घेऊन शासनाने २०२० सालापर्यंत व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट घेऊन मंचाने हा लढा सुरू केला आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये पळवाटा शोधण्याचेबंद करून महामार्ग स्थानिकस्वराज्य संस्थांना हस्तांतरित करण्याचे प्रयत्न तातडीने बंद करण्याची मंचाची प्रमुख मागणी आहे. २०११ साली शासनाने ठरविलेल्या व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुकानिहाय समितींच्या यंत्रणा गठित करण्याचे आवाहन मंचाने केले आहे.