जेईई-अॅडव्हान्समध्ये वेद लाहोटी अव्वल, मुलींमध्ये मुंबई झोनची द्विजा पटेल पहिली

By रेश्मा शिवडेकर | Published: June 9, 2024 04:41 PM2024-06-09T16:41:30+5:302024-06-09T16:46:12+5:30

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) प्रवेशासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱया जेईई-अॅडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर कऱण्यात आला असून दिल्ली झोनच्या वेद लाहोटी याने अव्वल कामगिरी करत देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षण शिक्षणसंस्थेत आपला प्रवेश निश्चित केला आहे.

Ved Lahoti topped in JEE-Advanced, Dwija Patel of Mumbai zone stood first in girls | जेईई-अॅडव्हान्समध्ये वेद लाहोटी अव्वल, मुलींमध्ये मुंबई झोनची द्विजा पटेल पहिली

जेईई-अॅडव्हान्समध्ये वेद लाहोटी अव्वल, मुलींमध्ये मुंबई झोनची द्विजा पटेल पहिली

मुंबई - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) प्रवेशासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱया जेईई-अॅडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर कऱण्यात आला असून दिल्ली झोनच्या वेद लाहोटी याने अव्वल कामगिरी करत देशातील सर्वोत्तम तंत्रशिक्षणशिक्षणसंस्थेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्याने ३६० पैकी ३५५ गुण मिळविले आहेत. मुलींमध्ये ३३२ गुण मिळवित द्विजा पटेल या विद्यार्थिनीने अव्वल कामगिरी केली आहे.

मुंबई झोनमधून राजदीप मिश्रा (सहावा), ध्रुवीन दोशी (नववा), शॉन कोशी (१५वा) आणि आर्यन प्रकाश (१७वा) यांनी अव्वल कामगिरी केली आहे. दिल्ली झोनचा आदित्य (३४६ गुण) दुसऱया रँकवर आहे. तिसऱया क्रमांकावर भोगलपल्ली संदेश (३३८ गुण) हा मद्रास झोनचा विद्यार्थी आहे. चौथ्यावर रूरकीचा रिदम केडिया (३३७ गुण) आहे. तर पाचवा क्रमांक मद्रासच्या पुट्टी कुशल कुमार (३३४ गुण) याने पटकावला आहे.

२६ मे रोजी झालेल्या या परीक्षेला देशभरातून १.८० लाख विद्यार्थी बसले होते. जेईई-मेनमध्ये पात्र ठरलेल्या निवडक विद्यार्थ्यांना जेईई-अॅडव्हान्सला बसता येते. यापैकी ४८,२४८ विद्यार्थी आयआयटीतील प्रवेशाकरिता पात्र ठरले आहेत.

जेईई-अॅडव्हान्सकरिता नोंदणी केलेल्या १,४३,६३७ मुलांपैकी १,३९,१८० मुलांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ४०,२८४ मुलगे प्रवेश पात्र ठरले आहेत. तर नोंदणी केलेल्या ४२,९४७ मुलींपैकी ४१,०२० मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ७,९६४ मुली प्रवेशाकरिता पात्र ठरल्या आहेत.

जेईई-अॅडव्हान्सकरिता पात्र ठरलेले विद्यार्थी- २.५ लाख

परीक्षेकरिता नोंदणी केलेले विद्यार्थी - १,८६,५८४

प्रत्यक्ष परीक्षा दिलेले विद्यार्थी - १,८०,२००

प्रवेश पात्र ठरलेले विद्यार्थी - ४८,२४८

प्रवेश पात्र मुलगे - ४०,२८४

प्रवेश पात्र मुली - ७,९६४

प्रवर्गनिहाय कटऑफ (विषयनिहाय आणि एकूण कटऑफ)

प्रवर्ग………..विषयनिहाय….. एकूण

खुला………..८.६८ टक्के…..३०.३४ टक्के

ओबीसी.……७.८ टक्के……२७.३०टक्के

इडब्ल्यूएस….७.८ टक्के…..२७.३० टक्के

एससी……….४.३४ टक्के…१५.१७ टक्के

एसटी………..४.३४ टक्के…१५.१७ टक्के

अपंग…………४.३ टक्के…..१५.१७ टक्के
 

Web Title: Ved Lahoti topped in JEE-Advanced, Dwija Patel of Mumbai zone stood first in girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.