वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प परराज्यात जाणं हे दुर्देवी; अब्दुल सत्तारांनी स्पष्टच सांगितलं! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 05:46 PM2022-09-15T17:46:59+5:302022-09-15T17:47:13+5:30

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही वेदांता-फॉक्सकॉनवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

Vedanta-Foxcon project going abroad is unfortunate; Said that Farmer Minister Abdul Sattar | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प परराज्यात जाणं हे दुर्देवी; अब्दुल सत्तारांनी स्पष्टच सांगितलं! 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प परराज्यात जाणं हे दुर्देवी; अब्दुल सत्तारांनी स्पष्टच सांगितलं! 

Next

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं राज्यात राजकारण तापलेलं असताना आता सरकारकडून राज्यात मोठा प्रकल्प आणण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन विरोधकांकडून सातत्यानं सरकारला लक्ष्य केलं जात आहे. तसंच फॉक्सकॉन प्रकल्प हातून निसटल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याचीही माहिती समोर आली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असं आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे. 

राज्यात आता वेदांता-फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प आणून विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यासाठी शिंदे सरकार कामाला लागल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. वेदांता प्रकल्प हा परराज्यात जाणे हे दुर्देवी आहे. महाविकास आघाडी हे पाप आता राज्य सरकारच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वकाही दोन महिन्यातच झाले असे नाही, यामागे मोठी पार्श्वभूमी असल्याचं अब्दुल सत्तारांनी सांगितलं. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला न मिळता गुजरातला गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारला खडेबोल सुनावले आहेत. "फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे आणि आता तो काही परत येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे या चर्चा आता बंद करुन नवीन काय करता येईल ते पाहायला हवं. खरंतर आधीच्या सरकारमध्ये उदय सामंत आणि एकनाथ शिंदे मंत्री होते आणि तेच आता आरोप करताहेत. महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वामुळे गुंतवणूक मिळायची", अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंकडून शिंदे सरकार लक्ष्य-

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळांना भेटी देत बसले पण त्यांनी राज्यात येणाऱ्या उद्योगांवर जरा लक्ष द्यायला हवं अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत. तसंच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर-

दुसरीकडे फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गुजरातला गेला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

Web Title: Vedanta-Foxcon project going abroad is unfortunate; Said that Farmer Minister Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.