वेदांता प्रकरणी मोठी अपडेट! शिंदे, फडणवीस अन् राणे थेट मोदींना भेटणार?, 'वर्षा'वर खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:59 PM2022-09-15T12:59:26+5:302022-09-15T13:01:02+5:30

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं राज्यात राजकारण तापलेलं असताना आता सरकारकडून राज्यात मोठा प्रकल्प आणण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Vedanta foxconn deal narayan rane meets cm eknath shinde will meet pm Modi | वेदांता प्रकरणी मोठी अपडेट! शिंदे, फडणवीस अन् राणे थेट मोदींना भेटणार?, 'वर्षा'वर खलबतं

वेदांता प्रकरणी मोठी अपडेट! शिंदे, फडणवीस अन् राणे थेट मोदींना भेटणार?, 'वर्षा'वर खलबतं

googlenewsNext

मुंबई-

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं राज्यात राजकारण तापलेलं असताना आता सरकारकडून राज्यात मोठा प्रकल्प आणण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन विरोधकांकडून सातत्यानं सरकारला लक्ष्य केलं जात आहे. तसंच फॉक्सकॉन प्रकल्प हातून निसटल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याचीही माहिती समोर आली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे. 

राज्यात आता वेदांता-फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प आणून विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यासाठी शिंदे सरकार कामाला लागल्याचं बोललं जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मध्यम-लघू-सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावर काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे पोहोचले आहेत. दोघांमध्ये वेदांता प्रकरणावरुनच खलबतं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात राज्यात उद्योग प्रकल्प आणण्याबाबत मोदींकडे मागणी करण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. यासाठी शिंदे, फडणवीस आणि नारायण राणे पंतप्रधान मोदींची लवकरच भेट घेणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

आदित्य ठाकरेंकडून शिंदे सरकार लक्ष्य
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळांना भेटी देत बसले पण त्यांनी राज्यात येणाऱ्या उद्योगांवर जरा लक्ष द्यायला हवं अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत. तसंच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर
दुसरीकडे फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गुजरातला गेला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

Web Title: Vedanta foxconn deal narayan rane meets cm eknath shinde will meet pm Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.