अनिल अग्रवाल पंतप्रधान मोदींना भेटले अन् सगळ्या गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली- रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 04:11 PM2022-09-19T16:11:09+5:302022-09-19T16:11:51+5:30

आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही आता शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Vedanta President Anil Agarwal met PM Narendra Modi and everything started to change, sadi that MLA Rohit Pawar | अनिल अग्रवाल पंतप्रधान मोदींना भेटले अन् सगळ्या गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली- रोहित पवार

अनिल अग्रवाल पंतप्रधान मोदींना भेटले अन् सगळ्या गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली- रोहित पवार

googlenewsNext

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्याचे समोर येताच राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाल्याचे दिसले. यानंतर गेले सलग काही दिवस विरोधी महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे.

आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही आता शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत सर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. मात्र याचदरम्यान राज्यातील सरकार बदललं. तसेच वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, तेव्हा सगळ्या गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली, असा आरोप रोहित पवारांनी केला. 

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात सुरु व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. तसेच या प्रकल्पाच्यादृष्टीने हलचालीही सुरु झाल्या होत्या. मात्र, आपले अपयश उघडे पडू नये, म्हणून राज्य सरकारकडून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

दरम्यान, माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात औद्योगिक गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर होता. गुजरातला आम्ही मागे ठेवले, याचा मला आनंदच आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच वेदांता गुजरातमध्ये गेला, म्हणजे तो पाकिस्तानला गेला नसून, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे अशी आठवणही देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना करून दिली आहे. गेल्या अडीच वर्षातील नाकर्तेपणा, घोटाळे आणि नकारात्मकता यामुळे महाराष्ट्र माघारला, अशी टीका करताना येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर-

फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गुजरातला गेला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

Web Title: Vedanta President Anil Agarwal met PM Narendra Modi and everything started to change, sadi that MLA Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.