Join us

विक्रोळीत ग्रंथ तुमच्या दारी पेटीच्या उद्घाटनाने सावरकर जयंती साजरी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 28, 2023 5:43 PM

मुंबईत १७०  ग्रंथ पेटी असून १० हजार वाचक या उपक्रमास जोडले गेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि “ग्रंथ तुमच्या दारी " मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने न्यु व्हिजन ऍकेडमी, पार्कसाइट,शिवाजीनगर, विक्रोळी पश्चिम येथे नवीन वाचन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

"वाचनाने शब्द सामर्थ वाढते, उत्तम संवाद साधण्याची  कला संपादित होते. आणि आपला सर्वांगीण विकास होतो" असे प्रतिपादन लेखक आणि मुख्य समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांनी केले.ग्रंथ तुमच्या दारी, मुंबई विभागाची जोमाने वाटचाल सुरु असून मुंबईत १७०  ग्रंथ पेटी असून १० हजार वाचक या उपक्रमास जोडले गेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

येथे वाचन केंद्र सुरू करण्यासाठी मयुर गायकवाड,ऋषिकेश खरात ,ऋषिकेश घोडके यांनी पुढाकार घेतला.यावेळी येथील विद्यार्थी, पालक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई