उन्हाळी सुट्टीत राणीची बाग बच्चेकंपनीने फुलली, बारशिंगाची जोडी प्रमुख आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:15 AM2019-05-08T03:15:11+5:302019-05-08T03:15:40+5:30

उन्हाळ्याच्या सुट्टीत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बच्चेकंपनीच्या हजेरीने फुलले आहे.

Veermata Jijabai Bhosale Udyan & Zoo news | उन्हाळी सुट्टीत राणीची बाग बच्चेकंपनीने फुलली, बारशिंगाची जोडी प्रमुख आकर्षण

उन्हाळी सुट्टीत राणीची बाग बच्चेकंपनीने फुलली, बारशिंगाची जोडी प्रमुख आकर्षण

Next

मुंबई  - उन्हाळ्याच्या सुट्टीत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बच्चेकंपनीच्या हजेरीने फुलले आहे. त्यात पेंग्विननंतर आलेल्या काही नवीन पाहुण्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांची अक्षरश: झुंबड उडत आहे. काही दिवसांपूर्वीच आलेली बारशिंगाची जोडी तर राणीबागेतील प्रमुख आकर्षण ठरत आहे. रविवारी तब्बल १२ हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावली.

राणीच्या बागेचे गेल्या काही वर्षांपासून नूतनीकरण सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने आता नवीन प्राणी प्राणिसंग्रहालयात आणण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात बिबट्या आणि बारशिंगाची जोडी राणीबागेत आणण्यात आली. बिबटे आक्रमक असल्याने सध्या त्यांचे निरीक्षण करण्यात येत असून, महिन्याभराने त्यांना नागरिकांसमोर आणण्यात येणार आहे.

मात्र तूर्तास गेल्या शुक्रवारी राणीबागेत आलेली बारशिंगाची जोडी चर्चेचा विषय ठरली आहे. हेम्बोल्ट जातीचे सात पेंग्विन राणीबागेचे आकर्षण ठरले होते. पेंग्विन पाहण्यास लाखो मुंबईकर राणीबागेत येत असतात. यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या उत्पन्नात १२ पट वाढ झाली आहे. त्यानंतर आता बारसिंगाची जोडी बच्चेकंपनीची लाडकी ठरली आहे.

दररोज येणारे पर्यटक -
आठ ते दहा हजार
वीकेण्डला - १५ हजार
पेंग्विन आल्यापासून - वीकेण्डला ३० हजार
माणशी - ५० रुपये
कुटुंब (आई, वडील, दोन मुले) - १०० रुपये
एप्रिल २०१८ पासून - सात कोटी उत्पन्न
५ मे २०१९ - "पाच लाख उत्पन्न

Web Title: Veermata Jijabai Bhosale Udyan & Zoo news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई