Join us

दिवाळीच्या सुट्टीमध्ये राणीबाग हाउसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 4:41 AM

भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विन हे मुख्य आकर्षण बनले आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असून बच्चेकंपनीसह पालकांची पेंग्विनला बघण्यासाठी झुंबड उडू लागली आहे.

मुंबई - भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विन हे मुख्य आकर्षण बनले आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी पडली असून बच्चेकंपनीसह पालकांची पेंग्विनला बघण्यासाठी झुंबड उडू लागली आहे. परंतु, आता पेंग्विन मेल्टिंग टाइममध्ये असून पर्यटकांनी पेंग्विनलाकोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, अशी सूचना राणीबागेमध्ये पोस्टरमार्फत दिल्या आहेत.सध्या पेंग्विनचा मेल्टिंग टाइम सुरू असून या वेळी पेंग्विन अतिसंवेदनशील असतात. तसेच पेंग्विन स्ट्रेसमध्येही असतात. या वेळीपेंग्विनला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असते. मेल्टिंग काळात पेंग्विन पक्ष्यांच्या शरीरावरील पिसे गळून पडतात आणि पंधरा दिवसांनी पुन्हा नवीन पिसे येतात. मेल्टिंगवेळी पेंग्विन अन्न खूप खातात. या वेळी त्यांचे वजन २० ते ३० टक्क्यांनी वाढते. कारण त्यांच्या अंगावर पिसे नसल्यामुळे त्यांना थंड पाणी सहन होत नाही. म्हणूनमेल्टिंगदरम्यान पेंग्विन पाण्यात जाणे टाळतात. १५ दिवसांनी पुन्हा नवीन पिसे पेंग्विनला आल्यावर ते नॉर्मल होतात, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या डॉक्टरांनी दिली. दिवाळीच्या सुट्टीमध्ये पेंग्विनला पाहण्यासाठी दिवसाला ४ ते ५ हजार पर्यटक येतात. तसेच शनिवार, रविवार आणि हॉलीडेच्या दिवशी पर्यटकांची संख्या १० हजारांवरपोहोचते.

मेल्टिंगच्या काळात लोकांकडून चुकीचा अर्थ लावला जातो. पेंग्विनच्या शरीरावरील सर्व पिसे गळून जात असून पर्यटकांना असे वाटते की, पेंग्विन पक्ष्यांना कोणता तरी आजार झाला आहे. त्यामुळे विद्रूप दिसत आहेत, असे अनेक तर्क लावलेजातात. असे चुकीचे अर्थ कुणी लावूनयेत. मेल्टिंग प्रक्रिया ही नैसर्गिक असून प्रत्येक वर्षी सुरू असते, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील अधिका-यांनी दिली.राणीची बाग आज खुलीबुधवार, लक्ष्मीपूजनानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. तथापि, या दिवशी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे. प्रत्येक बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त बंद ठेवण्यात येते. मात्र, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास नागरिकांसाठी सदर उद्यान व प्राणिसंग्रहालय सुरू ठेवून दुसºया दिवशी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बंद ठेवण्यात यावे, असा महापालिकेने ठराव केला आहे. साप्ताहिक सुट्टीनिमित्त सदर प्राणिसंग्रहालयगुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी नागरिकांसाठी बंद राहणार आहे

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र